'डॉन 3'मध्ये 'या' अभिनेत्रीची धमाकेदार एन्ट्री; रणवीरसोबत पहिल्यांदाच दिसणार मोठ्या पडद्यावर

अभिनेता रणवीर सिंहसोबत कोणती अभिनेत्री काम करणार याचा अखेर सस्पेन्स संपला आहे.
'डॉन 3'मध्ये 'या' अभिनेत्रीची धमाकेदार एन्ट्री; रणवीरसोबत पहिल्यांदाच दिसणार मोठ्या  पडद्यावर

'डॉन-3' या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. आता 'डॉन-3' मध्ये अभिनेता रणवीर सिंहसोबत कोणती अभिनेत्री काम करणार याचा अखेर सस्पेन्स संपला आहे. बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी ही या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

'एक्सेल मुव्ही'ने कियारा आडवाणीच्या एन्ट्रीचा व्हिडिओ शेअर केला आहे. कियारा आडवाणीचे डॉनच्या विश्वात स्वागत...,असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

रणवीर-कियारा पहिल्यांदाच एकत्र

रणवीर आणि कियारा हे दोघे पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्रितपणे काम करणार आहेत. त्यामुळे दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. कियारा या सिनेमात झळकणार असल्याचे वृत्त समजताच सोशल मीडियावर चाहत्यांनी तशा प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

बॉलिवूडचा तिसरा डॉन रणवीर -

अमिताभ बच्चन यांनी 1978 ला रिलीज झालेल्या चंद्रा बारोट दिग्दर्शित डॉन या चित्रपटात डॉनची भूमिका साकारली होती. या चित्रपटामधील अमिताभ बच्चन यांच्या अभिनयला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. त्यानंतर फरहान अख्तरने दिग्दर्शित केलेल्या 2006 रोजी रिलीज झालेल्या डॉन चित्रपटात शाहरुख खानने डॉनची भूमिका साकारली.2011 मध्ये रिलीज झालेल्या 'डॉन 2' चित्रपटामध्ये देखील शाहरुखनेच डॉनची भूमिका साकारली. आता 'डॉन-3' चित्रपटामध्ये रणवीर सिंह डॉन ही भूमिका साकारणार असून तो आता बॉलिवूडचा तिसरा डॉन ठरला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in