कियारा -सिद्धार्थ लवकरच लग्नबंधनात ; जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये लग्नगाठ बांधणार

लग्नासाठी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, करण जोहर आणि वरुण धवन यांना आमंत्रित करण्यात आले आहे
कियारा -सिद्धार्थ लवकरच लग्नबंधनात ; जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये लग्नगाठ बांधणार

बॉलिवूडची लोकप्रिय जोडी कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. सिद्धार्थ-कियारा 6 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार असल्याचे वृत्त आहे. राजस्थानमधील आलिशान राजवाड्यात ते सप्तपदी घेणार असल्याचे वृत्त आहे. आता त्यांच्या लग्नाच्या सुरक्षेबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नाला येणार्‍या पाहुण्यांसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थ-कियाराने लग्नाच्या सुरक्षेची जबाबदारी अंगरक्षक यासिनवर सोपवली आहे. यासिन हा बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा माजी अंगरक्षक आहे. सिद्धार्थ-कियारा जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. त्यांच्या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. लग्नासाठी 100 ते 125 जणांना आमंत्रित करण्यात आले आहे. सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. लग्नासाठी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, करण जोहर आणि वरुण धवन यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

कियारा-सिद्धार्थच्या लग्नासाठी सूर्यगढ पॅलेसमधील लक्झरी व्हिला बुक करण्यात आला आहे. या व्हिलामध्ये तब्बल 84 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. पाहुण्यांसाठी 70 गाड्याही बुक करण्यात आल्या आहेत. सूर्यगड पॅलेसचे दररोजचे भाडे एक ते दोन कोटींच्या दरम्यान आहे. कियारा-सिद्धार्थचे प्री-वेडिंग इव्हेंट्स 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in