किंग खानच्या 'डंकी'ला सेन्सॉरकडून मिळाले U/A सर्टिफिकेट;चित्रपटाचा रनटाइम आला समोर

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार प्रभासच्या 'सालार' या चित्रपटाचं शाहरुख खानच्या डंकी या चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.
किंग खानच्या 'डंकी'ला सेन्सॉरकडून मिळाले U/A सर्टिफिकेट;चित्रपटाचा रनटाइम आला समोर

बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानच्या बहुचर्चित 'डंकी' या चित्रपटाची प्रेक्षकवर्ग फार आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांत हा चित्रपट चित्रपटगृहात भेटीला येणार आहे. शाहरुखच्या 'डंकी' या चित्रपटाशी संबंधित एक अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजेच सेन्सॉरने पास केले आहे. तसेच या चित्रपटाचा रनटाईम देखील समोर आला आहे.

'डंकी' या चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनकडून U/A प्रमाणपत्र मिळाले आहे. यासोबतच चित्रपटाचा रनटाइमही 2 तास 41 मिनिटे असणार आहे. डंकी या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू होण्यापूर्वीच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपट सीबीएफसी बोर्डाकडे प्रमाणपत्रासाठी पाठवला होता. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार प्रभासच्या 'सालार' या चित्रपटाची शाहरुख खानच्या डंकी या चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. दोन्ही चित्रपट 21 डिसेंबर 2023 रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहेत.

'डंकी' या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये विकी कौशल आणि तापसी पन्नूही यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. बोमन इराणी, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोव्हर यांनी देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in