
अर्जुन कपूर, तब्बू आणि नसीरुद्दीन शाह अभिनित आगामी चित्रपट 'कुत्ते'ची घोषणा झाल्यापासून याची चर्चा सर्वत्र आहे. दर्शकांमध्ये उत्कंठा वाढत असतानाच अलीकडेच, निर्मात्यांनी या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले. अशातच, चित्रपटाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी दर्शक प्रतीक्षा करत असतानाच, निर्मात्यांनी या चित्रपटाचा मनोरंजक आणि इंटेन्स ट्रेलर प्रदर्शित केला आहे. तसेच, डार्क ह्युमरने भरपूर असलेल्या या ट्रेलरमध्ये सात ग्रे-शेडेड पात्रांना पाहायला मिळेल.
आज एका स्टार-स्टडेड कार्यक्रमात 'कुत्ते'या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. तसेच, या कार्यक्रमात दिग्दर्शक आसमान भारद्वाज, त्यांचे वडील विशाल भारद्वाज, चित्रपटाचे कलाकार अर्जुन कपूर, तब्बू, नसीरुद्दीन शाह, कोंकणा सेन शर्मा, कुमुद मिश्रा, राधिका मदन आणि शार्दुल भारद्वाजसह कुमार, लव रंजन, अंकुर गर्ग आणि रेखा भारद्वाज हे उपस्थित होते.
लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्सच्या बॅनरखाली लव रंजन, विशाल भारद्वाज, अंकुर गर्ग आणि रेखा भारद्वाज निर्मित, 'कुत्ते'हा चित्रपट गुलशन कुमार आणि भूषण कुमार यांच्या टी-सीरीजद्वारा प्रस्तुत आहे. तसेच, या चित्रपटाला संगीत विशाल भारद्वाज देणार असून गुलजार यांनी गीते लिहिली आहेत. 'कुत्ते' हा चित्रपट १३ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.