लग्नकल्लोळ...'या' दिवशी होणार रीलिज, कुणाच्या गळ्यात पडणार वरमाला? मोशन पोस्टरही झाले आऊट

या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणि मोशन पोस्टर देखील रीलिज झाले
लग्नकल्लोळ...'या' दिवशी होणार रीलिज, कुणाच्या गळ्यात पडणार वरमाला? मोशन पोस्टरही झाले आऊट
PM

मराठी चित्रपटसृष्टीसाठी २०२४ हे वर्ष खूपच खास असणार आहे. 2023 प्रमाणे 2024 मध्येही प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. 'लग्न कल्लोळ' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणि मोशन पोस्टर देखील रीलिज झाले आहे. आता प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल चांगलीच उत्सुकता वाढली आहे.

कोण आहे लग्नाच्या पोशाखात-

'लग्न कल्लोळ' या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर झळकत आहे. या पोस्टरमध्ये भूषण प्रधान, मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव लग्नाच्या पोशाखात दिसत आहेत. पण, तिघेही पाठमोरे आहेत आणि तिघांच्याही हातात वरमाला दिसतेय, त्यावरून मयुरी आता ही वरमाला नक्की भूषणच्या गळ्यात घालणार की सिद्धार्थच्या, असा प्रश्न सर्वांनाच पडलाय.

प्रेक्षकांची उत्सुकता पोहोचली शिगेला-

'लग्न कल्लोळ' या चित्रपटाच्या नावावरून आणि मोशन पोस्टरवरून हा चित्रपट 'लग्न' या विषयावर भाष्य करणारा आहे, हे दिसत आहे. मात्र आता यात 'कल्लोळ' काय पाहायाला मिळणार, याचे उत्तर मात्र चित्रपटच देऊ शकेल.

'या' दिवशी येणार चित्रपटगृहात-

'लग्न कल्लोळ' या चित्रपटाच्या नवीन पोस्टरसोबत रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. हा सिनेमा 1 मार्च 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शक मोहम्मद एस बर्मावाला तर या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in