दिग्गज विनोदी अभिनेते राजू श्रीवास्तव काळाच्या पडद्याआड

ह्दयविकाराचा झटका आल्याने एम्स रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची मृत्युशी झुंज आज अपयशी ठरली आहे
दिग्गज विनोदी अभिनेते राजू श्रीवास्तव काळाच्या पडद्याआड

दिग्गज विनोदी अभिनेते म्हणून प्रसिद्ध असलेले राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेले अनेक दिवस ते मृत्युशी झुंज देत होते. त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते.१० ऑगस्ट रोजी त्यांना ह्दयविकाराचा झटका आल्याने एम्स रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची मृत्युशी झुंज आज अपयशी ठरली आहे.

जीममध्ये ट्रेड मिलवर धावत असताना त्यांना ह्दयविकाराचा झटका आला होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर एन्जिओग्राफी करण्यात आली. तरीही ते बेशुद्धच होते. एन्जिओग्राफीमध्ये एका ठिकाणी १०० टक्के ब्लॉक सापडल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. ज्यांनी संपूर्ण देशाला हसवले त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या अकाली जाण्याने हास्य जगताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in