
गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसर सगळयांच चित्रपटांनी धुमाकुळ घातला आहे. त्यामध्ये हॉलिवूडचे २ सिनेमे चांगलेच चर्चेत आहेत. पहिला 'बार्बी'आणि दुसरा 'ओपनहायमर' असे दोन चित्रपट चांगलेच ट्रेडिंग मध्ये आहेत. त्यामध्ये 'ओपनहायमर' बद्दल भारतीयांना जरा जास्तच उत्सूकता होती.प्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलननं यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे आधीच प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. भारतामध्ये काय ही लोकांना हा चित्रपट आवडला तर काही लोकांनी या चित्रपटाला विरोध केला.
'ओपेनहायमर' 21 जुलै रोजी रिलीज झाला असून हा चित्रपट अणुबॉम्बचा जनक जे रॉबर्ट ओपनहायमर यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांनी आणि समिक्षकांनी खुप पसंती दिली असून जगभरातून आतापर्यत ओपनहायमरनं कोट्यवधीची कमाई केली आहे. भारतातून देखील ओपनहायरमरनं मोठी कमाई केली आहे. रिपोर्टनुसार 11 दिवसात या चित्रपटाने 95.15 कोटी जमा केले आहे.
'ओपनहायमर' या सिनेमात असलेल्या भगवद्गीतेचा एक सीन दाखवण्यात आला आहे. या सीनवर भारतात अनेकांनी आक्षेप घेतला असून काहींनी या चित्रपटावर नाराजी व्यक्त केलीय. अनेकांनी या चित्रपटावर मते मांडली आहे.त्यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतने हिने सिनेमाबद्दल तिचं मत मांडलं आहेतिने नुकताच हा चित्रपट पहिला आणि तिने तिचे मत सोशल मिडियावर व्हिडिओ शेयर करत चित्रपटाबाबतचा रिव्ह्यू शेयर केला आहे.
फोटो ट्विटरवर शेयर करत अभिनेत्री कंगना रणौतने लिहिले,'ओपनहायमर' हा सिनेमा खुप अप्रतिम आहे.पॉलिटिक्स ,फिजिक्स आणि इतिहास यांचं या तिन गोष्टीचा एकत्रित असा हा चित्रपट मला खूप आवडला आहे. जर सिनेमॅटिक ऑर्गेझम असं काही असेल तर माझ्यासाठी तो 'ओपनहायमर' हा चित्रपट आहे. इतकच नाही तर कंगनाने एक इंस्टाग्रामवर एक व्हिडिओही शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये तिने थोडक्यात 'ओपनहायमर' ची स्टोरी सांगितली आहे व सगळयांनी हा चित्रपट नक्की पहा हे देखील बोलली आहे आणि तिला चित्रपटातील भगवद्गीतेचा सीन खुप आवडल्याचं सांगितलं आहे.