
'आई कुठे काय करते?' ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. या मालिकेतील अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकर हिचा चाहतावर्ग मोठा आहे. ती सोशल मीडियावर देखील चाहत्यांसाठी कविता किंवा इतर काही गोष्टी सतत शेअर करत असते. गेली अनेक वर्षं ती या मालिकेशी जोडली गेलय, आणि यामुळे ती मालिकांच्या विश्वात यशाच्या शिखरावर पोचलीय असं म्हटलं तरी हरकत नाही. नुकताच तिने एक मोठा निर्णय घेतलाय.
मधुराणी प्रभुलकरने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली. तिनं वैयक्तिक आयुष्यात एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. तिनं तिच्या 'मिरॅकल्स अॅकॅडमी' या अभिनय शिकवणाऱ्या संस्थेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. या संस्थेतील संचालक पदाचा तिनं राजीनामा दिलाय.ही संस्था ती आणि तिचे यजमान प्रमोद प्रभुलकर गेली अनेक वर्षं चालवत आहेत. यापुढे या संस्थेसोबत तिचा काहीही संबंध नसेल, असं तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे.