महाभारत मालिकेत 'कर्ण' साकारणारे पंकज धीर यांचे निधन, ज्येष्ठ अभिनेत्याची कर्करोगाशी झुंज अपयशी

‘महाभारत’ या लोकप्रिय मालिकेत कर्णाची भूमिका साकारल्याने घराघरांत पोहोचलेले प्रसिद्ध अभिनेते पंकज धीर यांचे बुधवारी कर्करोगाने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते.
महाभारत मालिकेत 'कर्ण' साकारणारे पंकज धीर यांचे निधन
महाभारत मालिकेत 'कर्ण' साकारणारे पंकज धीर यांचे निधन
Published on

मुंबई : ‘महाभारत’ या लोकप्रिय मालिकेत कर्णाची भूमिका साकारल्याने घराघरांत पोहोचलेले प्रसिद्ध अभिनेते पंकज धीर यांचे बुधवारी कर्करोगाने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. पंकज यांच्या पश्चात मुलगा निकीतन आणि पत्नी अनीता असा परिवार आहे. धीर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

पंकज धीर यांना कर्करोग झाला होता, त्यावर त्यांनी मात केली होती. पण काही महिन्यांपूर्वी त्यांना पुन्हा कर्करोगाने ग्रासले. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्यावर उपचारादरम्यान मोठी शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि बुधवारी त्यांचे निधन झाले.

पंकज धीर हे उत्तम अभिनय व भारदस्त आवाजासाठी ओळखले जात होते. त्यांनी ‘सडक’, ‘सोल्जर’ आणि ‘बादशाह’ यासह इतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. पण १९८८ च्या ऐतिहासिक ‘महाभारत’ मालिकेतील कर्णाच्या भूमिकेमुळे त्यांना खरी लोकप्रियता मिळाली.

पंकज धीर यांचा मुलगा निकितन धीर हा देखील एक लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. निकितन ‘जोधा अकबर’ आणि ‘चेन्नई एक्सप्रेस’मधील त्याच्या भूमिकांसाठी विशेष ओळखला जातो.

logo
marathi.freepressjournal.in