समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' शो विरोधात सायबर सेलकडून FIR; पहिल्या ६ भागांमध्ये सहभागी ३० ते ४० जणांवर गुन्हे दाखल

कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शो विरोधात महाराष्ट्र सायबर सेलने मंगळवारी FIR दाखल केला आहे. मुंबईत समय आणि रणवीर यांच्याविरोधात आधीच तक्रारी दाखल झाल्या असताना, महाराष्ट्र सायबर सेलने आता शोच्या पहिल्या सहा भागांमध्ये सहभागी असलेल्या ३० ते ४० लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.
समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' शो विरोधात सायबर सेलकडून FIR; पहिल्या ६ भागांमध्ये सहभागी ३० ते ४० जणांवर गुन्हे दाखल
समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' शो विरोधात सायबर सेलकडून FIR; पहिल्या ६ भागांमध्ये सहभागी ३० ते ४० जणांवर गुन्हे दाखलसंग्रहित छायाचित्र
Published on

कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शो विरोधात महाराष्ट्र सायबर सेलने मंगळवारी FIR दाखल केला आहे. युट्यूबर रणवीर अलाहाबादिया हा समय रैनाच्या शोमध्ये परीक्षक म्हणून गेला असता त्याने अतिशय अश्लील आणि आक्षेपार्ह भाषा वापरली होती. त्यामुळे हा शो वादात आला आहे. मुंबईत समय आणि रणवीर यांच्याविरोधात आधीच तक्रारी दाखल झाल्या असताना, महाराष्ट्र सायबर सेलने आता शोच्या पहिल्या सहा भागांमध्ये सहभागी असलेल्या ३० ते ४० लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.

"महाराष्ट्र सायबर सेलने 'इंडियाज गॉट लेटेंट' या युट्यूब शोविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एकूण ३० ते ४० लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोच्या पहिल्या भागापासून ते सहाव्या भागापर्यंत सहभागी असलेल्या सर्व लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वांना नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सर्वांना त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी बोलावले जाईल," असे महाराष्ट्र सायबर सेलच्या एका अधिकाऱ्याने 'एएनआय'ला सांगितले.

शोचा निर्माता समय याने अद्याप या वादावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. रणवीरच्या वक्तव्यामुळे अनेकांनी त्याच्या पॉडकास्टवर बंदी घालण्याची मागणी केली. रणवीरने वापरलेल्या अतिशय आक्षेपार्ह भाषेबद्दल नेटकऱ्यांमध्ये त्याच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्याने भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली ऑनलाइन अश्लीलता आणि vulgarity पसरवल्याबद्दल शो आणि कंटेट क्रिएटर्सचा निषेध करण्यात आला आहे.

अनेक राजकीय नेत्यांनी देखील यावर टिप्पणी केली आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ''प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण जेव्हा ते इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणते तेव्हा ते चुकीचे ठरते. आपल्या समाजात काही नियम ठरवले गेले आहेत आणि कोणीही त्यांचे उल्लंघन करणे चुकीचे आहे. अशा प्रकरणांवर कारवाई व्हावी. माझ्या माहितीप्रमाणे माध्यम व्यासपीठावर अत्यंत अश्लील भाषा वापरली गेली आहे. अर्थातच ती पूर्णपणे चुकीची आहे.''

रणवीरने मागितली माफी

तीव्र टीकेनंतर सोमवारी रणवीरने माफी मागितली आहे. तो म्हणाला, ''कॉमेडी माझ्या कुवतीबाहेर आहे. मी इथे फक्त माफी मागण्यासाठी आलो आहे. मला अनेकांनी विचारले की, मी माझे व्यासपीठ याच प्रकारे वापरणार आहे का? अर्थातच नाही. मी काहीही स्पष्टीकरण देणार नाही. फक्त माफी मागतो.''

logo
marathi.freepressjournal.in