महेश बाबूच्या 'गुंटूर कारम'ने मोडला अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'चा' रेकॉर्ड; पहिल्याच दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई

चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे.
महेश बाबूच्या 'गुंटूर कारम'ने मोडला अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'चा' रेकॉर्ड; पहिल्याच दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूचा नुकताच 'गुंटूर कारम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केल्याचे दिसून येत आहे. 'गुंटूर कारम' सिनेमाने अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' या सिनेमाचा रेकॉर्ड ब्रेक केल्याचे सांगण्यात येत आहे.

'पुष्पा'ला मागे टाकत नवा विक्रम केला-

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा द राईज' चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 44 कोटींची कमाई केली होती. तर, महेश बाबूच्या 'गुंटूर कारम'ने पहिल्याच दिवशी 45 कोटींची कमाई करत पुष्पाचा विक्रम मोडला आहे. येणाऱ्या काळात हा चित्रपट 300 कोटींपर्यत मजल मारेल असेही बोलले जात आहे. या चित्रपटाला आंध्रप्रदेश आणि तेलंगाणात जोरदार प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. 'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटाच्या कमाईत तेलगू प्रेक्षकांचा 66 टक्के वाटा आहे.

सालार आणि आदिपुरुषचा रेकॉर्ड कायम-

गुंटूरच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईबद्दल सांगायचे झाले तर, पहिल्याच दिवशी या सिनेमाने पुष्पाला मागे टाकले असले तरी, प्रभासच्या 'सालार' आणि 'आदिपुरुषचा' रेकॉर्ड मात्र कायम आहे. ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुषने पहिल्याच दिवशी 48.5 कोटींची कमाई केली होती. तर सालारने 67.1 कोटींपर्यंत मजल मारली होती.

'गुंटूर कारम' या चित्रपटाचे दिग्दर्शन त्रिविक्रम श्रीनिवास यांनी केले आहे. या चित्रपटात महेश बाबूने मुख्य भूमिका साकारली असून त्याच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्यासह या चित्रपटात मीनाक्षी चौधरी, श्रीलिला यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. त्याचे संगीत दिग्दर्शन एस थमन यांनी केले असून त्याचीही चांगलीच चर्चा होत आहे. हरिका आणि हसीन यांच्या वतीने निर्मिती करण्यात आलेला 'गुंटूर करम' हा चित्रपट १२ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील सिनेमॅटोग्राफीचे देखील विशेष कौतुक होत आहे. मनोज परमहमसा आणि पीएस विनोद यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम पाहिले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in