Adipurush : वादात अडकलेला आणि सोशल मीडियावर ट्रोल झालेल्या 'आदिपुरुष'बाबत घेतला हा मोठा निर्णय!

दिग्दर्शक ओम राऊत आणि अभिनेता प्रभासच्या 'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आणि तो सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला. यानंतर आता निर्मात्यांनी या चित्रपटाबाबत मोठी घोषणा केली.
Adipurush : वादात अडकलेला आणि सोशल मीडियावर ट्रोल झालेल्या 'आदिपुरुष'बाबत घेतला हा मोठा निर्णय!

दाक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेता प्रभास (Prabhas) अभिनित आणि ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटाचा टिझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. यावर अनेकांनी नकारात्मक प्रतिक्रिया तर दिल्याच, शिवाय सोशल मीडियावरदेखील ट्रोलिंगचा सामना करावा लागला. एवढेच नव्हे तर या चित्रपटावर अनेक आक्षेपही घेण्यात आले. याचा विचार करता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. निर्मात्यांकडून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

निर्मात्यांनी अधिकृत निवेदन जारी करत म्हंटले आहे की, "आदिपुरुष हा केवळ एक चित्रपट नाही, तर प्रभू श्रीराम यांच्यावरील आमची भक्ती आणि आमच्या गौरवशाली इतिहास आणि संस्कृतीशी असलेल्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. आदिपुरुषच्या निर्मितीशी निगडित असलेल्या लोकांनी प्रेक्षकांना एक अद्भुत अनुभव देण्यासाठी आणखी थोडा वेळ द्यावा. आदिपुरुष आता १६ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. संपूर्ण भारताला अभिमान वाटेल असा चित्रपट बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुमचे प्रेम, सहकार्य आणि आशीर्वाद आमच्या सदैव पाठिशी राहू द्या."

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in