करणच्या 'या' प्रश्नाने मलायका वैतागली, बेडरूम सिक्रेट्स सांगताना...

गेल्या काही दिवसांपासून मलायका अरोरा मुव्हिंग इन विथ मलायका या शोमध्ये अनेक मोठे खुलासे करत आहे
करणच्या 'या' प्रश्नाने मलायका वैतागली, बेडरूम सिक्रेट्स सांगताना...

इंडस्ट्रीमध्ये शो कोणाचा आणि कुठलाही असला तरी फक्त आणि फक्त करण जोहरबद्दलच चर्चा झालीच पाहिजे. करण जोहर (Karan Johar) नुकताच मलायका अरोराच्या मूव्हिंग इन विथ मलायका (Malaika Arora) या शोमध्ये सहभागी झाला होता. ज्याचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा शो मलायकाचा असला तरी हवा करण जोहरचा दिसतो. कारण शोमध्ये करण जोहरने मलायका अरोराला असे काही टोकदार प्रश्न विचारले की त्याची तुफान चर्चा पाहायला मिळत आहे. मलाइकानेही करण जोहरला जोरदार प्रत्युत्तर दिले. गेल्या काही दिवसांपासून मलायका अरोरा मुव्हिंग इन विथ मलायका या शोमध्ये अनेक मोठे खुलासे करत आहे.

करण जोहरच्या काही प्रश्नांची उत्तरे देताना मलायका अरोरा नाराज झाली. या शोच्या माध्यमातून अभिनेत्री मलायका अरोराने पहिल्यांदाच ओटीटीमध्ये पदार्पण केले आहे. याची एक पोस्ट मलायकाने सोशल मीडियावर शेअर करत म्हटलं की, मी शेवटी हो म्हटलं आहे. या पोस्टवरून अनेक चर्चांना उधाण आले होते. शोमध्ये अचानक करण जोहर मलायका अरोराला तिच्या सेक्स लाईफबद्दल विचारताना दिसत आहे. करण मलायकाला तिच्या बेडरूमचे रहस्यही विचारतो. करण जोहर मलायकाला विचारताना दिसतोय, तू आणि अर्जुन बेडरूममध्ये काय प्रयोग करतेस? मात्र यावेळी मलायका अरोराने करण जोहरच्या प्रश्नांना उत्तरे देणे टाळले. मलायकाला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणे आवडत नाही. मलायका करण जोहरच्या प्रश्नांची उत्तरे देत नाही हे पाहून करण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलू लागला. मलायका आणि करण जोहरचा हा एपिसोड नक्कीच खास असणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in