मल्लिका शेरावत, पूजा बॅनर्जी ईडीच्या रडारवर

‘मॅजिक विन’ या सट्टेबाजीसंदर्भातील ॲॅपप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या रडारवर भारतीय अभिनेत्री आल्या असून ईडीने मल्लिका शेरावत आणि टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जी यांची चौकशी केली.
मल्लिका शेरावत, पूजा बॅनर्जी ईडीच्या रडारवर
Published on

मुंबई : ‘मॅजिक विन’ या सट्टेबाजीसंदर्भातील ॲॅपप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या रडारवर भारतीय अभिनेत्री आल्या असून ईडीने मल्लिका शेरावत आणि टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जी यांची चौकशी केली. ईडीकडून या आठवड्यात आणखी दोन जणांची चौकशी होणार आहे. हे ॲॅप दुबईतून चालवले जात असून त्याचा मालक पाकिस्तानचा आहे. त्यामुळे या ॲॅपद्वारे मिळणारा पैसा पाकिस्तानला जात आहे. ‘मॅजिक विन ॲॅप’ला काही सेलिब्रेटींनी पाठिंबा दिला असून या ॲॅपच्या समर्थनार्थ केलेले व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून प्रसारित केले. त्याच आधारे मल्लिका शेरावत आणि पूजा बॅनर्जी यांची चौकशी करण्यात आली. मल्लिकाने ई-मेलद्वारे आपले उत्तर ईडीला पाठवले आहे, तर पूजा ही ईडीच्या अहमदाबाद येथील कार्यालयात पोहोचली होती. या ॲॅपसंदर्भात ईडीने गेल्या ६ महिन्यांत देशभरात सुमारे ६७ छापे टाकले असून ३.५५ कोटी रुपये जप्त केले आहेत. मुंबई, दिल्ली, पुणे येथे छापे टाकत ईडीने काही जणांवर कारवाई केली आहे. आता पुढील आठवड्यात ईडीकडून आणखीन सात सेलिब्रेटींना समन्स पाठवण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in