‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा टीझर प्रदर्शित; अंकुश, कुशल, अभिजीत आणि संतोषच्या गँगचा चित्रपटगृहात होणार तुफान राडा

मराठी सिनेसृष्टीत सध्या एका नव्या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. मैत्रीची एक वेगळीच क्रेझ दाखवणारा 'मामाच्या गोव्याला जाऊया' हा चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाला आहे.
‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा टीझर प्रदर्शित; अंकुश, कुशल, अभिजीत आणि संतोषच्या गँगचा चित्रपटगृहात होणार तुफान राडा
‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा टीझर प्रदर्शित; अंकुश, कुशल, अभिजीत आणि संतोषच्या गँगचा चित्रपटगृहात होणार तुफान राडा
Published on

मुंबई : मराठी सिनेसृष्टीत सध्या एका नव्या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. मैत्रीची एक वेगळीच क्रेझ दाखवणारा 'मामाच्या गोव्याला जाऊया' हा चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच त्याचा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

बालगंधर्व परिवार ट्रस्ट आणि पुणे महानगरपालिका आयोजित अलविरा मोशन एंटरटेन्मेंट प्रस्तुत 'बालगंधर्व रंगमंदिर'च्या ५८ व्या वर्धापन दिन सोहळ्यात हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत या टीझरचे भव्य अनावरण करण्यात आले. यावेळी चित्रपटातील कलाकारांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाल्याने उपस्थित सिनेरसिकांचा उत्साह द्विगुणित झाला.

या सोहळ्याला चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजीत चव्हाण आणि प्रवीण तरडे उपस्थित होते. कलाकार आणि प्रेक्षकांमध्ये रंगलेल्या दिलखुलास संवादामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

टीझरची सुरुवातच गोव्याच्या भन्नाट आणि नॉस्टॅलजिक वातावरणाने होते. 'स्ट्रगलर साला'चे तीन जिगरी मित्र - कुशा, बाबा आणि संत्या - तसेच त्यांच्यात नव्याने सहभागी झालेला मामा यांची धमाल यात पाहायला मिळते. मराठी मनोरंजन क्षेत्रातील चार हुकमी एक्के अर्थात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, अभिजीत चव्हाण आणि संतोष जुवेकर एकत्र आल्यावर पडद्यावर किती धमाल उडू शकते, याची झलक या टीझरमध्ये पाहायला मिळते.

गोव्याची ट्रिप, मित्रांची घट्ट मैत्री, अनपेक्षित ट्विस्ट आणि टर्न्स तसेच दमदार पार्श्वसंगीत यामुळे हा टीझर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. टीझर पाहिल्यानंतर हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा फुल ऑन पॅकेज ठरणार असल्याच्या प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केल्या.'

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in