ममता कुलकर्णीने किन्नर आखाडा आणि महामंडलेश्वर पद सोडले, म्हणाली 25 वर्षांपासून मी...

ममता कुलकर्णीने नुकताच सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत महामंडलेश्वर पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. ती म्हणाली, ''मी महामंडलेश्वर यमाई ममता नंदागिरी या पदावरून राजीनामा देत आहे. आज किन्नर आखाड्यात मला घेण्यावरून समस्या निर्माण झाली आहे. मात्र मी 25 वर्षांपासून साध्वी आहे आणि साध्वीच राहणार.
ममता कुलकर्णीने किन्नर आखाडा आणि महामंडलेश्वर पद सोडले, म्हणाली 25 वर्षांपासून मी...
ममता कुलकर्णीने किन्नर आखाडा आणि महामंडलेश्वर पद सोडले, म्हणाली 25 वर्षांपासून मी...संग्रहित छायाचित्र
Published on

महाकुंभमेळ्यादरम्यान, सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारी आणि चर्चेत आलेली सेलिब्रिटी म्हणजे ममता कुलकर्णी. ममता कुलकर्णीने नुकताच सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत महामंडलेश्वर पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. ती म्हणाली, ''मी महामंडलेश्वर यमाई ममता नंद गिरी या पदावरून राजीनामा देत आहे. आज किन्नर आखाड्यात किंवा दोन्ही आखाड्यात मला घेण्यावरून समस्या निर्माण झाली आहे. मात्र मी 25 वर्षांपासून साध्वी आहे आणि साध्वीच राहणार. मी 25 वर्षांपूर्वीच बॉलीवूड सोडले आहे. मी स्वतःहून गायब राहिले. अन्यथा मेकअप आणि बॉलीवूडपासून कोणी कधी इतक्या लांब राहू शकतो का?'' असा प्रश्नही तिने केला. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

महामंडलेश्वर पदासाठी पैसे भरल्याविषयी ममता कुलकर्णीने केला खुलासा

ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर हे पद मिळाल्यानंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. तसेच या पदासाठी तिने मोठी रक्कम दिली आहे, असे म्हटले जात होते. याबाबत देखील तिने या व्हिडिओत खुलासा केला आहे. ती म्हणाली, ''मला महामंडलेश्वर पद मिळण्याच्या विरोधात असलेल्या लोकांबद्दल जास्त बोलायचे नाही. तिथे त्या खोलीत अनेक महामंडलेश्वर होते. त्यांनी माझ्याकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. माझ्याकडे तेवढेही नव्हते. तेव्हा माझ्यावतीने महामंडलेश्वर जयंबानंदगिरी यांनी हे पैसे भरले. बाकी जे लोक म्हणत आहेत 3-4 कोटी दिले ते सर्व खोटे आहेत.''

अभिनेत्री ममता कुलकर्णीने गेल्या काही दिवसांपूर्वी प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यात संन्यासाची घोषणा केली होती. ममताने महाकुंभ मेळ्यादरम्यान किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांची भेट घेतली होती. यानंतर, तिने संगमावर पिंडदानाचा विधीही केला होता. महाकुंभ मेळ्यात संन्यास घेतल्यानंतर, ममता कुलकर्णीला 'श्री यमाई ममता नंद गिरी' असे नावही देण्यात आले होते. याचबरोबर तिची किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. या सोहळ्याचे फोटो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

मात्र, तिला महामंडलेश्वर पद देण्याबाबत अनेकांनी आक्षेप घेतले. या आक्षेपांनंतर किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावरून हटवले असून तिला आखाड्यातूनही बाहेर काढले होते. तसेच लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनाही आचार्य महामंडलेश्वर पदावरून हटवून, आखाड्यातून काढून टाकण्यात आले होते. एका महिलेला किन्नर अखाड्याचे महामंडलेश्वर बनवणे, हे सिद्धांतांना धरून नाही, असेही अजय दास यांनी म्हटले होते.

ममताच्या चाहत्यांकडून तिच्या निर्णयाचे समर्थन

ममताचे चाहते तिच्या या निर्णयाचे समर्थन करत आहेत. एका चाहत्याने कमेंट केली की, ''आम्ही तुमच्यासोबत आहोत ममता मॅम आम्ही तुमच्या प्रत्येक निर्णयाला साथ देतो."

आणखी एका नेटिझनने कमेंटमध्ये तिला 'मा' अर्थात 'आई' म्हटले आणि लिहिले, "आई तुम्ही एकदम बरोबर आहात...बाबा महाकाल सर्व काही पाहत आहे. ते सर्व काही ठीक करतील''.

logo
marathi.freepressjournal.in