Bigg Boss OTT 3: ‘रिॲलिटी शो’च्या नावाखाली अश्लिलता! ‘बिग बॉस-३ ओटीटी’ शो तातडीने बंद करा - मनीषा कायंदे

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील रिॲलिटी शो ‘बिग बॉस सिझन-३’मध्ये अश्लिलता दाखवली जात असून हा शो तातडीने बंद करावा, अशा मागणीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
Bigg Boss OTT 3: ‘रिॲलिटी शो’च्या नावाखाली अश्लिलता!  ‘बिग बॉस-३ ओटीटी’ शो  तातडीने बंद करा - मनीषा कायंदे
Published on

मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्मवरील रिॲलिटी शो ‘बिग बॉस सिझन-३’मध्ये अश्लिलता दाखवली जात असून हा शो तातडीने बंद करावा, अशा मागणीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या गंभीर विषयी शिवसेना सचिव आणि प्रवक्त्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना निवेदन देत शो तातडीने बंद करा, अशी मागणी केली आहे.

कायंदे यांनी सोमवारी शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ओटीटीवर दाखवल्या जाणाऱ्या बिग बॉस सिझन-३ मधील १८ जुलै २०२४ रोजी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये कलाकार कॅमेऱ्यासमोर अतिशय बीभत्स आणि किळसवाणे कृत्य करत असल्याचे दाखवल्याचे पोलीस आयुक्तांच्या निदर्शनात आणून दिले. याच शोदरम्यान अरमान मलिक आणि कृतिका मलिक यांनी कलाकारांना कौटुंबिक नात्याचा सर्व सीमा पार करत सामाजिक मूल्ये पायदळी तुडवली असल्याची टीका डॉ. कायंदे यांनी केली.

‘बिग बॉस-३’ या शोने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. लहान मुले हा शो पाहतात, याकडे पोलिसांचे लक्ष वेधले.

logo
marathi.freepressjournal.in