
अभिनेत्री मनिषा रानी(Manisha Rani) ही गेल्या काही दिवासांपासून सतत चर्चेत आहे. बिग बॉस OTT-2 नंतर तिच्या लोकप्रियतेत खुपचं वाढ झाली. बिग बॉसच्या घरात तिनं सगळयांचं खूप मनोरंजन केलं असून या शोने तिला एंटरटेनमेंट क्वीनचा टॅगही दिला आहे. अनेक प्रेक्षकांची मनं जिंकत ती या शोची सेकंड रनर अप ठरली. सध्या मनिषाचं नावं अनेक सेलिब्रिटींसोबत जोडलं जातं आहे. तिच्या आणि सिंगर टोनी कक्करच्या(Tony Kakkar) डेटिंगच्या बातम्याही खुप चर्चेत आहेत. मात्र, मनिषाने आता एका मुलाखतीत या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
बिग बॉस OTT-2 संपल्यानंतर मनिषा अनेकदा टोनी कक्कर सोबत स्पॉट झाली. त्यामुळे दोघी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. इचकच नाही तर मनिषाच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर चक्क 'टोनिषा' हे हॅशटॅगही देखील व्हायरल केलं आहे. मनिषा ही तिच्या मैत्रीमुळे कायम चर्चेत असते. तिची बिग बॉसच्या घरातही एल्विश आणि अभिषेक यांच्या बरोबर चांगली गट्टी जमली होती.
यानंतर सोशल मीडियावर 'एल्विशा', 'अभिषा' आणि 'टोनिषा' असे बरेचं हॅशटॅग चांगलेच व्हायरल झाले होते. त्यावर जेव्हा मनिषाचा आवडता हॅशटॅग कोणता? हे विचारल्यावर तिने याबद्दल सांगितलं आहे. या प्रश्नावर उत्तर देत मनिषा म्हणाली की, तिला तिन्ही हॅशटॅग आवडतात. सध्या 'टोनिषा' आणि 'अभिषा' हे दोन्ही तिच्या मनाजवळ आहे. तर टोनी बद्दल बोलतांना मनिषा म्हणाली की, "टोनी कक्कर हा खूप चांगला आहे. खुप कमी वेळात माझी त्याच्यासोबत चांगली मैत्रीही झाली. तो एक शांत आणि सभ्य स्वभावाचा माणूस आहे. टोनी लोकांचा खूप मनापासून आदर करतो. सहसा स्टार लोकांमध्ये खुप इगो असतो. मात्र, जेव्हा तो माझ्या वडिलांना भेटला होता. त्यावेळी तो माझ्या वडिलांच्या पाया पडला होता. मला त्याचं हे वागणं खुप आवडलं. नेहा कक्कर देखील खूप चांगली आहे. ते दोघेही 'डाउन टू अर्थ' आहेत". तर डेटिंगबद्दल विचारल्यानंतर "मनिषा रानीने या सर्व अफवा आहेत असं सांगितले. ते दोघेही फक्त मित्र असल्याचं ती म्हणाली. मनिषा आणि टोनी कक्कर हे दोघेही लवकरच एका म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र दिसणार आहेत."