Manoj Bajpayee : अभिनेते मनोज बाजपेयी यांना मातृशोक

रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही दिवसांपासून गीतादेवी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. पण अचानक...
Manoj Bajpayee : अभिनेते मनोज बाजपेयी यांना मातृशोक

अभिनेता मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांची आई गीता देवी (Geeta Devi) यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. गीता देवी यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आज (गुरुवारी) पहाटे त्यांचा मृत्यू झाला. ज्येष्ठ चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी याबाबत ट्विट केले आहे.

अशोक पंडित यांनी ट्विट करून गीता देवी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच मनोज बाजपेयी आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करण्यात आला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही दिवसांपासून गीतादेवी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. पण अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. मनोज त्याच्या व्यस्त शुटिंग शेड्युलमधून वेळ काढून त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये भेटायचा. मनोजने गेल्यावर्षी वडील गमावले. ऑक्टोबरमध्ये दिल्लीतील रुग्णालयात वडील आर.के. वाजपेयी यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोजने अनेक मुलाखतींमध्ये आपल्या आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, माझ्या आईने मला नेहमीच खंबीर साथ दिली. गीता देवी यांना तीन मुली आणि तीन मुलगे आहेत. मनोज बाजपेयी हे त्यांचे दुसरे अपत्य. अभिनेते मनोज कुमार यांच्या नावावरून पालकांनी मनोजचे नाव ठेवले. मनोज बाजपेयी यांचे वडील शेतकरी होते आणि त्यांची आई गृहिणी होती.

logo
marathi.freepressjournal.in