'ही' मराठी अभिनेत्री 'आदिपुरुष' सिनेमात शुर्पनखेच्या भूमिकेत; चाहत्यांना बसला आर्श्चयाचा धक्का
ओम राऊत या मराठमोळ्या दिग्दर्शकाने आपल्या बहुर्चित आणि बहुप्रतिक्षित 'आदिपुरुष' या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेता प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान, सनी सिंग, देवदत्त नागे यांच्यासारखी तगडी स्टार कास्ट घेतली आहे. या चित्रपटात ओम राऊतने एका मराठी अभिनेत्रीला एक महत्वाची भूमिका दिली आहे. शुर्पनखाची भूमिका साकारणारी ही मराठी अभिनेत्री आतापर्यंत 'आदिपुरुष'च्या प्रमोशनपासून दूर राहिली आहे.
खरं तर आपण 'आदिपुरुष' या सिनेमात झळकणार असल्याची माहिती या अभिनेत्रीने काही महिन्यांपूर्वीच दिली होती. मात्र, आपण या चित्रपटात नेमकी कोणती भूमिका करणार आहोत याबाबत कोणताही खुलासा तिने केला नव्हता. सिनेमाच्या निर्मात्यांकडून देखील तिच्या भूमिकेबाबत कोणताही खुलासा करण्यात आला नव्हता. त्यामुळे सिनेमा प्रदर्शित झाल्यावर तिला अचानक मोठ्या पडद्यावर पाहणं हे मराठी प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज होतं. तेजस्वी पंडित असं 'आदिपुरुष' सिनेमात शुर्पनखेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे.
ओम राऊत याने दिग्दर्शित केलेल्या 'आदिपुरुष' या सिनेमात मराठी अभिनेता देवदत्त नागे हनुमानाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून देवदत्त नागे हा या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारत आहे याबात प्रेक्षकांना कल्पना होती. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी देखील तो हजर होता. मात्र, तेजस्विनी पंडित कुठल्याही प्रमोशनला दिसली नाही. चित्रपटाचे निर्माते तसंच खुद्द तेजस्विनी पंडितने देखील शुर्पनखेच्या भूमिकेबद्दल बोलणं टाळलं होतं. अचानकपणे तेजस्विनी पंडितला या महत्वाच्या भूमिकेत पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.