पडद्यावरील ‘खाष्ट सासू’ कालवश! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे निधन

पडद्यावरील ‘खाष्ट सासू’ म्हणून रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे सोमवारी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या.
ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे निधन
ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे निधन
Published on

मुंबई : पडद्यावरील ‘खाष्ट सासू’ म्हणून रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे सोमवारी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या.

आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर मराठी रंगभूमी, सिनेमा आणि टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी एक खास स्थान निर्माण केले होते. टीव्हीवर गाजलेल्या ‘गजरा’ मालिकेमुळे त्या घराघरात पोहोचल्या होत्या.

दया डोंगरे यांना शाळेत असतानाच अभिनयाची गोडी लागली होती. त्यांनी अनेक एकांकिका स्पर्धा केल्या आणि त्यानंतर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून नाटकाचे तंत्रशुद्ध शिक्षण घेतले.

logo
marathi.freepressjournal.in