अभिनेत्री प्रार्थना बेहरे का होतेय ट्रोल? वाचा सविस्तर

मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behare) ही नेहमीच तिच्या सोशल मीडियाच्या पोस्टमुळे चर्चेत असते.
अभिनेत्री प्रार्थना बेहरे का होतेय ट्रोल? वाचा सविस्तर
@PrarthanaBehare

अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behare) ही 'माझी तुझी रेशीमगाठ' तसेच, हिंदीतील 'पवित्र रिश्ता' सारख्या मालिकांमुळे ती घराघरात पोहचली. मराठीमधील एक सुंदर, सोज्वळ अभिनेत्री म्हणून तिची ओळख निर्माण झाली आहे. प्रार्थना सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. यावेळी तिने केलेल्या एका इंस्टाग्राम पोस्टवरून मात्र चांगलीच ट्रोल झाली. तिने एक व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर काही चाहत्यांनी तिच्यावर टिप्पण्या केल्या.

प्रार्थना बेहरेने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये ती एका बोल्ड ड्रेसमध्ये दिसत आहे. तसेच, या व्हिडीओमध्ये केलेल्या हावभावाने अनेकांचे लक्ष तर वेधून घेतलेच, शिवाय ट्रोलिंगचाही तिला सामना करावा लागला. एका चाहत्याने तिला, 'अंकिता लोखंडेला कॉपी करतेय का?' अशी कमेंट केली. तर, एकाने 'अंगात आलाय का तुझ्या?' अशी कमेंट केली. एक युझर कमेंट करत म्हणाला की, 'मला आधी 'ड्युरेक्स कंडोमची जाहिरात वाटली'. तर एकाने, "कामसूत्र कंडोमची जाहिरात आहे का?" असं प्रश्न विचारला.

प्रार्थना बेहरेने हिंदी मालिका चित्रपटांसहित मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या तिची मराठी मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच, 'मितवा', 'कोफी आणि बरंच काही'सह अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिंदीमध्ये तिने सुप्रसिद्ध हिंदी मालिका 'पवित्र रिश्ता'मध्येही भूमिका केली होती. तसेच, 'बॉडीगार्ड', 'वजाह तुम हो' सारख्या हिंदी चित्रपटांमध्येही तिने भूमिका केल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in