Sakhi Gokhale: सखी गोखलेची बॉलिवूडकडे पुन्हा एकदा झेप, झळकणार 'या' चित्रपटात!

Sakhi Gokhale in Bollywood: 'दिल दोस्ती दुनियादारी' या प्रसिद्ध मालिकेपासून पासून सखीचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला. टीव्ही सिरीयल पासून सुरु झालेला हा प्रवास आता बॉलिवुड मध्ये येऊन पोहचला आहे.
Sakhi Gokhale: सखी गोखलेची बॉलिवूडकडे पुन्हा एकदा झेप, झळकणार 'या' चित्रपटात!

Marathi Actress Sakhi in Bollywood: सखी गोखले हे नाव तरुणाईला चांगलेच माहित आहे. आपल्या लुक्स आणि अभिनयाने तिने अनेकांच्या मनावर राज्य केलं. अभिनेत्री, लेखिका म्हणून सखी गोखलेची ओळख आहे. अभिनय, कला आणि अनेक गोष्टींची सांगड घालत ती काम करते. 'दिल दोस्ती दुनियादारी' या प्रसिद्ध मालिकेपासून पासून सखीचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला. टीव्ही सिरीयल पासून सुरु झालेला हा प्रवास आता बॉलिवुड मध्ये येऊन पोहचला आहे. नुकताच आंतरराष्ट्रीय फायर फायटर दिना निमित्त 'अग्नी' चित्रपटाच पोस्टर आउट झालं आहे. या चित्रपटात अभिनेत्री सखी गोखले देखील दिसणार आहे. सखीने आजवर अनेक नाटकात, चित्रपटात, मालिकेत काम केलं आहे. आता आपण तिला 'अग्नी' मध्ये मोठ्या पडद्यावर बघणार आहोत.

२०२४ अनेक मराठी कलाकारांनी केलं बॉलिवूडमध्ये केलं काम

२०२४ मध्ये अनेक मराठी कलाकारांनी बॉलिवुड गाजवलं. सखी गोखले देखील आता या यादीत सामील होणार आहे. अग्नी मध्ये सखीच्या सोबतीने अनेक मोठमोठे कलाकार दिसणार आहेत. अग्नीमध्ये प्रतीक गांधी, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, देव्येंदू, सयामी खेर अशी सगळी तगडी स्टारकास्ट दिसणार आहे.

नवीन कामाबद्दल काय म्हणाली सखी?

अग्नी बद्दल बोलताना सखी म्हणते " अग्नीच चित्रीकरण करण हा माझ्यासाठी खूप छान अनुभव होता अनेक बड्या कलाकारांच्या सोबतीने यात काम करता आला आणि हा निव्वळ योगायोग होता म्हणून सेटवर आपली जवळची लोकं असल्यासारखं वाटलं. अग्नी चे दिग्दर्शक राहुल ढोलाकिया यांच्या सारख्या उत्तम दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी या निमित्ताने मिळाली हा अनुभव देखील सुंदर होता. अग्नी मध्ये माझं सगळ्यात जास्त काम हे देविंद्यू सोबत आहे त्याचसोबत काम करण्याचा अनुभव भारी होता एक को अ‍ॅक्टर म्हणून तो कमालीचा कलाकार आहे. प्रतीक गांधी, सई ताम्हणकर आणि जितू दादा यांच्या सोबत एकत्र येऊन काम करताना चा अनुभव मी शब्दात मांडू शकत नाही. सगळ्यांच्या सोबतीने मी सुद्धा अग्नी साठी तितकीच उत्सुक आहे "

आहे उत्तम फोटोग्राफर

सखी अभिनयाच्या सोबतीने एक अव्वल कलाकार देखील आहे. सखी अभिनेत्री तर आहेच पण ती उत्तम फोटोग्राफर देखील आहे. २०१८ मध्ये तिने आर्ट क्युरेशन मध्ये मास्टर केलं असून अभिनयाच्या सोबतीने सखी स्वतःच्या आवड जपत अनेक काम करताना दिसतेय. आगामी काळात सखी अजून काय काय काम करणार हे बघण उत्सुकतेच असणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in