'मराठी पाऊल पडते पुढे' प्रेक्षकांच्या भेटीला

चिराग पाटील याचा मराठी बाणा चित्रपटात दिसणार
'मराठी पाऊल पडते पुढे' प्रेक्षकांच्या भेटीला

एकीकडे मराठी चित्रपटाला सिनेमागृहात स्थान नाही, अशी ओरड सुरू असताना आणि इतर मराठीसह अन्य भाषिक चित्रपट सुरू असताना मराठी पाऊल पडते पुढे ह्या चित्रपटाला मराठी माणसाचा उदंट प्रसिताद लाभत आहे. शुक्रवार ५ मे पासून महाराष्ट्रभरातील सर्वच सिनेमागृहात प्रदर्शित झालेला हा चित्रपट अनोख्या प्रचार पद्धतीमुळे गेला महिनाभर चर्चेत राहिला. एकूणच महाराष्ट्रातल्या अनेक चित्रपटगृहात चित्रपटाला जोरदार बुकिंग झाल्याचे दिसून आले. आणि त्यामुळे मराठी ह्या नावाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

अनेक मराठी तरुणांना नोकरी सोडून व्यवसाय करण्याची आत्यंतिक इच्छा आहे. पण, नेमकं काय करायचं? सुरुवात कुठुन करायची? ध्येय निश्चित करून त्यावर मार्गस्थ कसे व्हायचे? ह्या प्रश्नांच्या पलिकडे जाऊन मुलभूत व अत्यंत गरजेची असलेली व्यावसायिक मानसिकता व चिकाटी कशी जोपासायची, ह्यांचे उद्बोधक आणि मनोरंजक उत्तर प्रकाश बाविस्कर निर्मित व शिवलाईन फिल्म्स प्रस्तुत ‘मराठी पाऊल पडते पुढे’ ह्या चित्रपटाच्या माध्यमातून मिळत असल्याने खास करून तरुणांनी आणि व्यवसाय इच्छुक मराठी भाषिकांनी ह्या चित्रपटाला पसंती दिल्याचे लक्षात येते.

लेखक-दिग्दर्शक स्वप्निल मयेकर यांनी लिहिलेल्या कथेमध्ये मराठी माणसाने अल्पसंतुष्ट मनोवृत्तीतून बाहेर पडून व्यवसाय करण्यासाठी लागणारी धमक कशी असावी, ह्याचे दर्शन घडवले आहे. ह्या चित्रपटात चिराग पाटील, सिद्धी पाटणे, जेष्ठ अभिनेते अनंत जोग, सतीश पुळेकर, सतीश सलागरे, संजय कुलकर्णी, संजय क्षेमकल्याणी आणि प्रदीप कोथमिरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

logo
marathi.freepressjournal.in