मराठवाडा हे चित्रपटांचे सक्षम केंद्र बनेल : दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश झोटिंग व पूर्वी भावे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकिशोर नंदकिशोर कागलीवाल यांनी, तर आभार प्रा. शिव कदम यांनी मानले.
मराठवाडा हे चित्रपटांचे सक्षम केंद्र बनेल : दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर

छत्रपती संभाजीनगर : आपण जेव्हा गुजराती आणि बंगाली चित्रपटांबद्दल बोलत असतो तेव्हा तो एका विशिष्ट राज्याचा असतो; मात्र, इथे विभागीय चित्रपटांसह जागतिक चित्रपट पाहायला मिळत आहेत. मराठवाडा हे चित्रपटांचे सक्षम केंद्र बनू शकेल जिथे चित्रपट येथील आणि ते राष्ट्रीय स्तरावर पोहचतील, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी यावेळी केले.

जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप समारंभ आज आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न झाला. यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या समारोप समारंभास विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, भारतीय सिनेमा स्पर्धा गटाचे ज्युरी चेअरमन धृतिमान चॅटर्जी, फ्रिप्रेस्की इंडियाचे ज्युरी चेअरमन एन. मनू चक्रवर्थी, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, महोत्सव संचालक अशोक राणे, महोत्सवाचे कलात्मक संचालक चंद्रकांत कुलकर्णी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश झोटिंग व पूर्वी भावे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकिशोर नंदकिशोर कागलीवाल यांनी, तर आभार प्रा. शिव कदम यांनी मानले.

‘मराठवाडा शॉर्ट फिल्म स्पर्धा’ पाहून मी आश्चर्यचकित

मी अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात येऊन मनस्वी आनंदी आहे. कमी कालावधीत या महोत्सवाने खूप प्रगती केलेली आहे. या महोत्सवात ‘मराठवाडा शॉर्ट फिल्म स्पर्धा’ पाहून मी आश्चर्यचकित झालो आहे. अजिंठा आणि वेरूळच्या लेण्या पाहायला या भागामध्ये मी दहा वर्षांपूर्वी आलो होतो. त्यानंतर पानिपतच्या निर्मितीच्यावेळी देवगिरी किल्ला पाहण्यासाठी आलो होतो आणि आता आपल्या या नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी आलो आहे. याचा अर्थ माझी दिवसेंदिवस प्रगती होत आलेली असल्याचे गोवारीकर म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in