ऐश्वर्याने काढली 'हम दिल दे चुके सनम' ची आठवण

'पोन्नियिन सेल्वन 2' चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत ऐश्वर्याने दिला जुन्या आठवणींना उजाळा
ऐश्वर्याने काढली 'हम दिल दे चुके सनम' ची आठवण

'पोन्नियिन सेल्वन 2' हा चित्रपट येत्या २८ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. नुकतीच मुंबईत या चित्रपटाच्या टीमने पत्रकारांशी संवाद साधला . यावेळी दिग्दर्शक मणिरत्नम, संगीत दिग्दर्शक ए.आर.रहमान यांच्यासह ऐश्वर्या राय आणि इतर कलाकार मंडळी सुद्धा उपस्थित होती मणिरत्नम यांच्या सिनेमात तिने यापूर्वीही काम केलं आहे. 'इरुवर', 'गुरु', 'रावन' हे चित्रपट ऐश्वर्याने मणिरत्नम यांच्यासोबत केले. मणिरत्नम यांना ऐश्वर्या राय गुरुस्थानी मानते त्यामुळे त्यांच्यासोबत चित्रपट करणं हा अतिशय समृद्ध करणारा अनुभव असतो.

'पोन्नियिन सेल्वन 2' या चित्रपटात ऐश्वर्या राय नंदिनी ची भूमिका साकारत आहे.संजय लीला भन्साळी यांच्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपट ही ऐश्वर्या रायने नंदिनी साकारली होती. 'हम दिल दे चुके सनम' मधील ऐश्वर्या रायची ती भूमिका अतिशय गाजली होती. त्यासोबतच सलमान खान सोबतच्या डेटिंगच्या चर्चांनाही उधाण आलं होतं . आजही ऐश्वर्या राय आणि सलमान खान चे चाहते त्यांच्या जुन्या प्रेमाची आठवण काढल्याशिवाय राहत नाहीत. पत्रकार परिषदेत जुन्या नंदिनीची आठवण निघताच ऐश्वर्या राय ला देखील भरून आलं. ऐश्वर्या म्हणाली, 'काय योगायोग आहे. आणि हे किती छान आहे, ना? 'हम दिल दे चुके सनम' मधील नंदिनीही सर्वांच्या खूप लक्षात राहिली होती. ती लोकांच्या मनात अजूनही आहे. मला नंदिनीची भूमिका करण्याची संधी मिळाली याबद्दल मी खूप आभारी आहे.' ऐश्वर्या राय पुढे म्हणाली, 'ती नंदिनी प्रेक्षकांसाठी आणि माझ्यासाठीही खूप खास होती. त्यावेळी मला संजय भन्साळी आणि आता मणिरत्नम यांच्या पोन्नियिन सेल्वनसाठी मला नंदिनीची भूमिका करायला मिळाली. अनेकांच्या मनाला भिडणारे पात्र करायची मला संधी मिळते हे माझ्यासाठी एखाद्या आशीर्वादासारखे आहे. त्यासाठी मी निर्मात्यांची आणि दिग्दर्शकांची खूप आभारी आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in