बहुप्रतिक्षित "मेरी ख्रिसमस" साठी ऍडव्हान्स बुकिंग सुरू

नवीन वर्षाच्या निमित्ताने प्रेक्षकांना एक खास भेट मिळणार आहे, कारण कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांच्या बहुप्रतिक्षित 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे.
बहुप्रतिक्षित "मेरी ख्रिसमस" साठी ऍडव्हान्स बुकिंग सुरू
PM

श्रीराम राघवन दिग्दर्शित "मेरी ख्रिसमस" साठी ऍडव्हान्स बुकिंग सुरू झाल्याचे, निर्मात्यांनी बुधवारी जाहीर केले. नवीन वर्षाच्या निमित्ताने प्रेक्षकांना एक खास भेट मिळणार आहे, कारण कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांच्या बहुप्रतिक्षित 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. कतरिना कैफ आणि विजय सेतुपती हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असतील. हा चित्रपट शुक्रवारी 12 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तरण आदर्श या आपल्या ट्विटर हॅन्डल वरुन हि बातमी दिली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी केले आहे, ज्यांनी यापूर्वी 'अंधाधुन'सारखे हिट चित्रपट दिले आहेत. या चित्रपटाची निर्मिती रमेश तौरानी, ​​जया तौरानी, ​​संजय राउतराई आणि केवल गर्ग यांनी केली आहे.

"मेरी ख्रिसमस" च्या हिंदी आवृत्तीत सहकलाकार संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा कन्नन आणि टिनू आनंद आहेत, तर तमिळ पुनरावृत्तीमध्ये राधिका सरथकुमार, षण्मुगराजा, केविन जय बाबू आणि राजेश विल्यम्स समान भूमिकेत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in