मित्र असावा तर असा! मिका सिंगने मित्राला दिले आठ कोटींचे फ्लॅट भेट

मिका सिंग हा त्याच्या दोस्तीमुळे चांगलाच ओळखला जातो. मित्र असावा तर असा, असं मिकाकडे पाहून अनेक लोक नेहमी म्हणत असतात
मित्र असावा तर असा! मिका सिंगने मित्राला दिले आठ कोटींचे फ्लॅट भेट

प्रसिद्ध गायक मिका सिंगने गेली अनेक वर्ष आपल्या गाण्यांनी चाहत्यांना वेड लावलं आहे. मिका सिंग नेहमी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत असतो. मिकाने आता पुन्हा एका नव्या कारणाने चर्चेत आला असून त्याने सर्वांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं आहे.

मिका सिंग हा त्याच्या दोस्तीमुळे चांगलाच ओळखला जातो. मित्र असावा तर असा, असं मिकाकडे पाहून अनेक लोक नेहमी म्हणत असतात. आता पुन्हा एकदा त्याने हे सिद्ध केलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, मिकाने त्याच्या मित्राच्या वाढदिवशी त्याला खूप मोठं गिफ्ट दिलं आहे. मिकाचा खास मित्र कंवलजीत सिंग याचा नुकताच वाढदिवस झाला होता. यानिमित्त मिकाने त्याच्या मित्राला दिल्ली आणि मुंबईत ४-४ कोटींचे दोन फ्लॅट भेट म्हणून दिले आहेत. मिकाने त्यांच्या मित्राला दिलेल्या भेटीमुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

इतकंच नाही तर गेल्या वर्षीच्या वाढदिवशी सुद्धा मिकाने त्याच्या या मित्राला मर्सिडीज गाडी भेट केली होती. त्याची किंमत 80 लाख होती. आणि यावर्षी चक्क त्याने वाढदिवसाला त्याला फ्लॅट दिले आहे. या सगळ्या गोष्टीमुळे मिका सिंग चांगलाच चर्चेत आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in