नाकात नथ, कपाळी कुंकू अन्..., 'सुभेदार'मधील मृण्मयी देशपांडेचा लुक व्हायरल

मृण्मयी देशपांडेने सुभेदार चित्रपटातील लुक शेयर करत सोशल मीडियावर लिहिलं आहे...
नाकात नथ, कपाळी कुंकू अन्...,  'सुभेदार'मधील मृण्मयी देशपांडेचा लुक व्हायरल

महाराष्ट्राच्या शिवकालीन इतिहास प्रत्येक पानावर मराठयांच्या अतुलनीय शौर्यने भरलेले आहे. सुभेदार तान्हाजी मालुसरेंचा कोंढाण्यावारील पराक्रम अशीच एक सुवर्णगाथा २५ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या 'सुभेदार' या मराठी चित्रपटातून आपल्या सगळ्यांसमोर उलगडणार आहे. या चित्रपटातील बऱ्याच कलाकारांचे लुक समोर आले आहेत.

आता 'सुभेदार' या चित्रपटात केसरी ची भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा लुक समोर आला आहे. तिला या लुक मध्ये ओळखणं सगळयांनाच खूप कठीण जातं आहे. मृण्मयी देशपांडेने सुभेदार चित्रपटातील लुक शेयर करत सोशल मीडियावर लिहिलं आहे. "हात बांधून लई बनतुया? ह... हात सोड! मग तुला नाय मुघलांच्या सात पिढ्यांना दाखवते... मराठ्यांना नाडायचा नतीजा काय असतुया", असं कॅप्शन तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोला दिलं आहे.

तिच्या या लुकमध्ये खूप वेगळेपण आहे. मृण्मयीच्या डोक्यावर पदर असून कपाळावर भलं मोठं लाल भडक कुंकूवाचं वर्तूळ आहे. नाकात नथ तर गळ्यात कवड्यांची माळ पाहायला मिळत आहे. तिला या लुक मध्ये ओळखणे फार कठीण जात आहे. मृण्मयी देशपांडेच्या या लुकला चाहत्यांची मोठी पसंती मिळताना दिसत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in