Video:नांदा सौख्यभरे...मुग्धा आणि प्रथमेशचा विवाहसोहळा संपन्न

दोघांच्या लग्नाला नातेवाईक आणि मित्रमैत्रीणींच्या उपस्थितीत होती. या दोघांच्या लग्नाचे फोटो - व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
प्रथमेशने काढले कुटुंबासोबत फोटो
प्रथमेशने काढले कुटुंबासोबत फोटो

'सा रे ग म प लिटील चॅम्प्स' फेम गायक जोडी प्रथमेश लघाटे - मुग्धा वैशंपायन यांच्या लग्नाची धामधूम सध्या सुरु आहे. हे दोघे गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहेत. त्या दोघांनी लग्नसमारंभाचे विविध फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या दोघांच्या लग्नाची अनेकांना उत्सुकता होती. अखेर थाटामाटात त्यांनी एकमेकांशी लग्न केले . त्या दोघांच्या लग्नाला नातेवाईक आणि मित्रमैत्रीणींच्या उपस्थितीत होती. या दोघांच्या लग्नाचे फोटो - व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिपळुणमध्ये या दोघांनी एकमेकांशी लग्न केलं आहे . प्रथमेश चिपळूण, रत्नागिरीला राहणारा असून त्याच्या गावी हे लग्न झाल्याचे बोलले जात आहे. प्रथमेशने लग्नाच्यावेळी लाल रंगाचा कुर्ता, खांद्यावर उपरणं तर डोक्यावर पगडी घातली होती. तर मुग्धाने पिवळ्या - हिरव्या रंगाची शेड असलेली साडी नेसली होती.

"हरिद्रा लापन । मांगलिक स्नान", "हरिद्रा लापन । घाणा भरणे" -

"हरिद्रा लापन । मांगलिक स्नान" असे कॅप्शन देऊन प्रथमेशने फोटो शेअर केले आहेत. तर "हरिद्रा लापन । घाणा भरणे", असे कॅप्शन देत मुग्धाने हळदीचे फोटो शेअर केले. या दोघांच्या हळदीच्या फोटोंना त्यांच्या चाहत्यांनी फार पसंती दर्शवली आहे. दोघांनी पारंपरिक थाटात हळदीचा समारंभ साजरा केल्याने चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in