मराठी चित्रपट सृष्टीवर दु:खाचा डोंगर ; निर्माते मुकेश उदेशी काळाच्या पडद्याआड

'गो गोवा गॉन', 'एक विलिन', 'कलकत्ता मेल' अशा लोकप्रिय सिनेमांचे ते निर्माते होते.
मराठी चित्रपट सृष्टीवर दु:खाचा डोंगर ; निर्माते मुकेश उदेशी काळाच्या पडद्याआड

मागील काही दिवसांपासुन मनोरंजन क्षेत्रातून दु:खद बातम्या ऐकायला मिळत आहेत. आता मराठी सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ निर्माते मुकेश उदेशी यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. 'गो गोवा गॉन', 'एक विलिन', 'कलकत्ता मेल' अशा लोकप्रिय सिनेमांचे ते निर्माते होते. मुकेश उदेशी यांचं काल रात्री (११ सप्टेंबर) रोजी दुःखद निधनं झालं.

मुकेश उदेशी हे लोकप्रिय चित्रपट निर्माते असून त्यांना परदेशात चित्रपट निर्मिती आणि शुटींगचा ३७ वर्षांचा अनुभव आहे. मुकेशचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास कमाई करू शकले नाहीत, मात्र प्रेक्षकांच्या हृदयात त्यांचे स्थान कायमचं झालं आहे.

ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अनेक मोठ्या कलाकारांनी मुकेश यांना शेवटची श्रद्धांजली वाहली. त्याचबरोबर चाहत्यांनीही मुकेश यांना अखेरचा निरोप दिला. मुकेशच्या अशा जाण्यानं सर्वांनाच खूप दुःख झालं आहे. त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. मुकेश यांच्या अंत्यसंस्काराबद्दल अजून कोणतीही बातमी समोर आली नाही. त्यांच्या अंतिम संस्काराबाबत कुटुंबाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मुकेश यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांनाही खूप मोठा धक्का बसला आहे. दर्जेदार चित्रपटांची निर्माती करणारा अवलिया आज काळाच्या पडद्याआड गेला आहे.

logo
marathi.freepressjournal.in