Mumbai : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र 'व्हेंटिलेटर सपोर्ट'वर; प्रकृती चिंताजनक

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले असल्याचे सांगण्यात येते. ८९ वर्षीय धर्मेंद्र यांचे कुटुंबीय रुग्णालयात उपस्थित असून त्यांच्या मुलींना अमेरिकेतून बोलावण्यात आले आहे.
Mumbai : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र 'व्हेंटिलेटर सपोर्ट'वर; प्रकृती चिंताजनक
Published on

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर आहे आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले असल्याचे सांगण्यात येते. डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. मात्र, धर्मेंद्र यांच्यासाठी पुढील ७२ तास महत्त्वाचे असणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे धर्मेंद्र यांचे चाहते त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत आहेत.

८९ वर्षीय धर्मेंद्र यांचे कुटुंबीय रुग्णालयात उपस्थित असून त्यांच्या मुलींना अमेरिकेतून बोलावण्यात आले आहे. धर्मेंद्र यांच्या टीमने त्यांच्या प्रकृतीबाबत खुलासा केला आहे. “धर्मेंद्र यांना नुकतेच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत, पण काळजी करण्यासारखे काहीही नाही. त्यांची प्रकृती सुधारत आहे. देओल कुटुंबाने खोट्या बातम्या टाळण्याचे आवाहन केले आहे. आता संपूर्ण कुटुंब धर्मेंद्र यांच्यासोबत रुग्णालयात असून त्यांच्या मुली अजिता आणि विजेता अमेरिकेतून येत आहेत,” असे टीमकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in