‘तारक मेहता...’ मालिकेच्या निर्मात्यावर गुन्हा दाखल ; अभिनेत्रीचे लैगिंक छळप्रकरण

त्यांच्या छळाला कंटाळून आपण ही मालिका सोडली होती. तिने तक्रार अर्ज सादर करताना संबंधित तिघांची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली
‘तारक मेहता...’ मालिकेच्या निर्मात्यावर गुन्हा दाखल ; अभिनेत्रीचे लैगिंक छळप्रकरण
Published on

मालिका अभिनेत्रीचा लैगिंक छळ केल्याप्रकरणी ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेचा निर्माता असित मोदी, ऑपरेशन हेड सोहेल रमाणी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज या तिघांविरुद्ध पवई पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदविला आहे. या तिघांची पोलिसांकडून चौकशी करून जबानी नोंदविण्यात येणार आहे. दरम्यान या अभिनेत्रीने केलेल्या आरोपांचे या तिघांनी खंडन केले आहे.

जेनिफर मिस्त्री ही तारक मेहता या मालिकेत रोशन सोढीच्या पत्नीची भूमिका करत होती. तिने मालिकेचे निर्माता असितकुमार मोदी, प्रोजेक्ट हेड सोहेल रमाणी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्याविरुद्ध लैगिंक छळ केल्याचा आरोप करून त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार केली होती. त्यांच्या छळाला कंटाळून आपण ही मालिका सोडली होती. तिने तक्रार अर्ज सादर करताना संबंधित तिघांची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, असितकुमार यांनी या आरोपांचे खंडन करताना जेनिफरने केलेले सर्व आरोप निराधार असल्याचे सांगितले होते. अशाप्रकारे आरोप करून तिच्याकडून मालिकेला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान अभिनेत्रीच्या तक्रारी वरिष्ठांनी गंभीर दखल या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पवई पोलिसांना दिले होते. या चौकशीनंतर तिच्या तक्रारीवरून या तिघांविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदविला आहे. जेनिफरने तारक मेहता या मालिकेत २००८ साली काम करण्यास सुरुवात केली होती. पाच वर्षांनी गर्भवती राहिल्यानंतर तिने काही काळासाठी मालिकेतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर तिने पुन्हा कामाला सुरुवात केली होती. मात्र पेमेंटवरून तिचा प्रोडेक्शन हाऊसशी वाद झाला होता. त्यातून या तिघांनी तिचा मानसिक व शारीरिक शोषण करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्याशी अश्‍लील कमेंट केले जात होते. त्यानंतर तिने दिल्ली महिला आयोगासह मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर तिला मालिकेतून काढून टाकण्यात आले होते. तिच्या बदनामीचा प्रयत्न संबंधित तिघांकडून झाल्याचा आरोप तिने केला होता.

logo
marathi.freepressjournal.in