मुनव्वर फारूकी बिग बॉसच्या 17 व्या सिझनचा विजेता

यंदाच्या सीझनमध्ये टॉप ५ मध्ये असलेली अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा, अरुण मॅशेटे हे स्पर्धक बाद झालेत.
मुनव्वर फारूकी बिग बॉसच्या 17 व्या सिझनचा विजेता

सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉस १७ या रिॲलिटी शोचा ग्रँड फिनाले काल (२८ जानेवारी) पार पडला. स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारूकी बिग बॉसच्या 17 व्या सिझनचा विजेता ठरला. मुनव्वर फारूकीला बिग बॉस 17 च्या ट्रॉफीसोबतच 50 लाख रुपये आणि ह्युंडाई क्रेटा ही कार मिळाली आहे. तर उपविजेता हा अभिषेक कुमार ठराला. यंदाच्या सीझनमध्ये टॉप ५ मध्ये असलेली अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा, अरुण मॅशेटे हे स्पर्धक बाद झालेत. टॉप ५ मध्ये बिग बॉस १७ ची ट्रॉफी कोण जिंकणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. हा निकाल मध्यरात्री १२ वाजता निकाल जाहीर करण्यात आला. ऑक्टोंबरमध्ये सूरू झालेला हा रिअ‍ॅलीटी शो अखेर संपला.

मुनव्वर फारुकीने ट्रॉफी आणि अभिनेता सलमान खान सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात सलमान व मुनव्वर ट्रॉफी पकडून पोज देत आहेत. त्यात त्याने म्हंटल आहे की “खूप खूप आभार जनता. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे ट्रॉफी अखेर डोंगरीला आलीच. मार्गदर्शनासाठी मोठे भाऊ यांने विशेष आभार,”

कोण आहे विजेता मुनव्वर फारुकी-

मुनव्वर फारुकी हा स्टँड-अप कॉमेडियन, यूट्यूबर आणि रॅपर आहे. तो कंगना राणावतच्या 'लॉक अप' या रिॲलिटी शोचा विजेता आहे. मुनव्वर फारुकीने शो दरम्यान खुलासा केला होता की, कौटुंबिक कारणांमुळे त्याला पाचवीनंतर शाळा सोडावी लागली होती. मात्र, नंतर मुनव्वरने पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर तो ग्राफिक डिझायनिंग शिकला. मात्र, वडिलांच्या आजारपणामुळे त्याला पुन्हा शिक्षण सोडावं लागलं. ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केल्यानंतर मुनव्वरने एका एजन्सीत ग्राफिक डिझायनर म्हणूनही काम केलं. "

बिग बॉस 17 चे स्पर्धक

फिनाले एपिसोड दरम्यान, करम राजपाल आणि तृप्ती मिश्रा त्यांच्या नवीन शो कयामत से कयामत तकच्या प्रमोशनसाठी बिग बॉस 17 च्या सेटवर आलं होते. दरम्यान, बिग बॉस 17 ची सुरुवात अंकिता लोखंडे, विकी जैन, नील भट्ट, ऐश्वर्या शर्मा, ईशा मालवीय, सना खान, रिंकू धवन, सनी आर्या, खानजादी, सोनिया बन्सल, अनुराग डोभाल, जिग्ना वोरा, मुनावर फारुकी, मन्नारा चोप्रा यांसारख्या स्पर्धकांसह झाली. अरुण मॅशेटे, नवीद सोले आणि अभिषेक कुमार. नंतर के-पॉप गायिका आओरा, मनस्वी ममगाई, समर्थ जुरेल आणि आयशा खान या शोमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सामील झाले.

logo
marathi.freepressjournal.in