संगीत उस्ताद रशिद खान यांची कर्करोगाशी झुंज अपयशी; वयाच्या 55 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

"आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. पण, अयशस्वी झालो. दुपारी 3.45 च्या सुमारास त्यांचे निधन झाले," अशी माहिती खान उपचार घेत असलेल्या खाजगी रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यानी दिली आहे.
संगीत उस्ताद रशिद खान यांची कर्करोगाशी झुंज अपयशी; वयाच्या 55 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

संगीत उस्ताद म्हणून ओळखले जाणारे उस्ताद रशिद खान यांचे आज(9 जानेवारी) निधन झाले आहे. त्यांना कर्करोगाची लागण झाली असल्याने कोलकाता येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. 55 वर्षीय रशिद खान यांची कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली आहे. "आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. पण, अयशस्वी झालो. दुपारी 3.45 च्या सुमारास त्यांचे निधन झाले," अशी माहिती खान उपचार घेत असलेल्या खाजगी रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यानी दिली आहे.

खान यांना कॅन्सरने ग्रासले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात होते. सुरुवातीला त्यांनी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कर्करोगावर उपचार घेत होते. मात्र, नंतर त्यांना कोलकाता येथे उपचार सुरू ठेवायचे असल्याने त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, खान कोलकाता येथील रुग्णालयात उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत होते. मात्र, अचानक त्यांच्या प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. यावेळी उपचारांना प्रतिसाद न दिल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

logo
marathi.freepressjournal.in