१५ दिवसांचे शूटिंग, २० कोटींची एसएस राजामौली यांची ऑफर! तरीही नाना म्हणाले ‘नको’, कारण...

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी तब्बल २० कोटी रुपयांच्या ऑफरला नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. ही ऑफर चक्क आघाडीचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी दिली होती. त्यांच्या आगामी 'SSMB29' या बिग-बजेट चित्रपटात नानांना महत्त्वाची भूमिका ऑफर करण्यात आली होती. मात्र त्यांनी ही संधी सौम्य शब्दांत नाकारली.
१५ दिवसांचे शूटिंग, २० कोटींची एसएस राजामौली यांची ऑफर! तरीही नाना म्हणाले ‘नको’, कारण...
Published on

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी तब्बल २० कोटी रुपयांच्या ऑफरला नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. ही ऑफर चक्क आघाडीचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी दिली होती. त्यांच्या आगामी 'SSMB29' या बिग-बजेट चित्रपटात नानांना महत्त्वाची भूमिका ऑफर करण्यात आली होती. मात्र त्यांनी ही संधी सौम्य शब्दांत नाकारली.

महेश बाबू आणि प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत

'SSMB29' या चित्रपटात महेश बाबू आणि प्रियांका चोप्रा यांची मुख्य भूमिका आहे. या दोघांसोबत पृथ्वीराज सुकुमारन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण जानेवारी २०२५ मध्ये सुरू झाले असून, अलीकडेच प्रियांका चोप्राने भारतात येऊन महेश बाबूसोबत हैदराबादमध्ये शूटिंगचे पहिले शेड्यूल पूर्ण केले.

नाना पाटेकर यांना महत्त्वाच्या भूमिकेची ऑफर

'द लल्लनटॉप' वृत्ताच्या आधारे २०२४ च्या अखेरीस एसएस राजामौली स्वतः पुण्यात नाना पाटेकरांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यांनी चित्रपटाची संकल्पना, पटकथा सांगितली आणि नानांची लूक टेस्टही झाली. मात्र, नानांना भूमिका पुरेशी ठोस आणि समाधानकारक वाटली नाही. त्यामुळे त्यांनी १५ दिवसांच्या शूटिंगसाठी मिळणाऱ्या २० कोटींची ऑफर नाकारली.

दैनंदिन मानधन ₹१.३ कोटी! तरीही नकार

या चित्रपटासाठी नानांना दैनंदिन १.३ कोटींचे मानधन दिले जाणार होते. पण त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ही भूमिका त्यांना कलात्मक समाधान देणारी नाही. त्यामुळे त्यांनी भूमिका नाकारली, पण राजामौलींसोबत भविष्यात काम करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.

प्रियांकाचे पुनरागमन

प्रियांका चोप्रा या चित्रपटाद्वारे तब्बल चार वर्षांनी भारतीय चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे. ती शेवटची २०२१ मध्ये 'The White Tiger' या चित्रपटात झळकली होती. 'SSMB29' ची कथा राजामौलींचे वडील, सुप्रसिद्ध लेखक व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे. हा चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

राजामौलींचा पुढील महत्त्वाकांक्षी प्रकल्प

'SSMB29' नंतर एसएस राजामौली यांचा पुढील सिनेमा दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारित असेल. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत असल्याचे संकेत मिळाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in