नाशिक टोलनाका प्रकरण : 'या' मराठी अभिनेत्याचं खोचकं ट्विट चर्चेत

मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांच्याशी संबंधीत नाशिक टोलनाका प्रकरण चांगलचं गाजताना दिसत आहे
नाशिक टोलनाका प्रकरण : 'या' मराठी अभिनेत्याचं खोचकं ट्विट चर्चेत
Published on

सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांच्याशी संबंधीत नाशिक टोलनाका प्रकरण चांगलचं गाजताना दिसत आहे. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहे. अनेकांनी या प्रकराच्या समर्थानार्थ मते नोंदवली आहेत. तर काही हा चुकीचा प्रकार असल्याचं म्हणत याचा निषेध केला आहे. सार्वजनीक बांधकाममंत्री दादा भूसे यांनी देखील कायदा सर्वांसाठी समान असून या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल, असं म्हटलं आहे.

याता प्रकरणी एका मराठी अभिनेत्याचं ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अमित ठाकरे यांची गाडी अडवल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्यांनी संतप्त होऊन नाशिकच्या समृद्धी महामार्गावरील टोलनाका फोडला. त्यावर या अभिनेत्याने तिखट प्रतिक्रिया देत ट्विट केलं आहे. त्याच्या या ट्विटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अभिनेता आरोह वेलणकर हा सोशम मीडियावर नेहमी सक्रिय असतो. तो निर्भीडपणे आपलं मत व्यक्त करत असतो. आता त्यांने एक ट्विट करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी नाशिकचा टोलनाका फोडल्याप्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. त्याने आपल्या ट्वटिर हँडलवरुन टोलनाका फोडल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. यावर त्याने, 'काय फालतूपणा आहे. म्हणून कोणी मत देत 'नाही.' असं तिखट कॅप्शन दिलं आहे. त्याने केलेल्या या ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

logo
marathi.freepressjournal.in