National Film Award 2023 : निखिल महाजन यांनी पटकावला राष्ट्रीय पुरस्कार

'गोदावरी' या चित्रपटासाठी निखिल महाजन यांना 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' हा मानाचा पुरस्कार घोषित झाला
National Film Award 2023 : निखिल महाजन यांनी पटकावला राष्ट्रीय पुरस्कार

६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात दिल्लीत करण्यात आली. यात 'गोदावरी' या चित्रपटासाठी निखिल महाजन यांना 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' हा मानाचा पुरस्कार घोषित झाला. जितेंद्र जोशीने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. नाशिकमधील गोदावरी नदी आणि त्याच्या आसपास राहणारी, परंपरा, रूढी जपणारी माणसं आणि तीन पिढ्यांची मानसिकता यात दर्शवण्यात आली आहे.

दिग्दर्शक निखील महाजन यांनी त्यांना जाहीर झालेल्या पुरस्कारावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि, "कदाचित माझ्या हृदयाच्या सर्वात जवळ असलेल्या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला ही एक वास्तविक भावना आहे. हा पुरस्कार माझ्या आई आणि बाबांसाठी आहे, ज्यांनी मला माझे स्वप्न पूर्ण करता यावे यासाठी अथक प्रयत्न केले. माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या पाठीशी उभे राहिलेले जितेंद्र जोशी यांच्यासाठी आहे. हा माझ्या संपूर्ण कलाकार आणि गोदावरीच्या क्रूसाठी आहे ज्यांनी येणाऱ्या कोणत्याही संकटावर एखाद्या चॅम्पियन्ससारखं मात करत एकत्र येवून हा सिनेमा घडवून आणला. हा पराक्रम गोदावरी आपल्या हृदयात धारण केलेल्या नाशिकसाठी आहे. हा पुरस्कार माझे चित्रपट निर्माते जिओ स्टुडिओजसाठी आहे, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझा आवाज आणि दूरदृष्टी सर्वत्र पसरवली. हा पुरस्कार विक्रम गोखले यांच्यासाठी आहे ज्यांनी शूटिंगच्या पहिल्या दिवशी मी हे जिंकेन असं सांगितलं होतं, आणि शेवटी हा पुरस्कार ज्याच्यासाठी मी 'गोदावरी' बनवला, अशा दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्यासाठी आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळणे म्हणजे खऱ्या अर्थाने एक वर्तुळ पूर्ण करणे होय." अशी भावनिक प्रतिक्रिया निखिल महाजन यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in