Rautu Ka Raaz Trailer: पहाडी स्टाईलमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी सोडवणार हत्येचे रहस्य, 'रौतू का राज’चा ट्रेलर प्रदर्शित!

Nawazuddin Siddiqui: हे कथानक उत्तराखंडमधील रौतू की बेली या नयनरम्य गावावर आधारित आहे. गेल्या वर्षी ५४ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफ्फी) या सिनेमाचा गाला प्रीमियर झाला होता.
Rautu Ka Raaz Trailer out
Rautu Ka Raaz Trailer out
Published on

New OTT Movie: झी स्टुडिओज आणि फाट फिश रेकॉर्ड्स निर्मित आणि आनंद सुरापूर दिग्दर्शित ‘रौतू का राज़' ही नवाजुद्दीन सिद्दीकीचा नवीन सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात अभिनेता इन्स्पेक्टर दीपक नेगीच्या मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या रहस्यमय थरारपटात राजेश कुमार, अतुल तिवारी आणि नारायणी शास्त्री यांच्याही सहाय्यक भूमिका आहेत. हे कथानक उत्तराखंडमधील रौतू की बेली या नयनरम्य गावावर आधारित आहे. गेल्या वर्षी ५४ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफ्फी) या सिनेमाचा गाला प्रीमियर झाला होता, जिथे या सिनेमाचं जोरदार स्वागत झाले आणि आता २८ जून रोजी ओटीटी प्रीमिअरसाठी सज्ज आहे.

काय आहे कथानक?

दीड दशकाहून अधिक काळापासून खुनाची एकही घटना न अनुभवलेल्या रौतू की बेली येथील अंध शाळेतील वॉर्डनच्या रहस्यमय मृत्यूने ग्लानीत असलेले गाव हादरते. या खुनाभोवती कथानक फिरते. येथेच एसएचओ दीपक नेगी उर्फ नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या टीमचा प्रवेश होतो. कारण त्यांना या दुर्मिळ आणि हाय-प्रोफाइल हत्येचा तपास सोडवण्याचे काम सोपवण्यात आले आहे. या सिनेमात एसएचओ दीपक नेगी आणि उपनिरीक्षक डिमरी यांच्यातील एक आगळीवेगळी तसेच आनंदी मैत्री दाखवण्यात आली आहे. या खुनाची उकल करण्याची जबाबदारी दोघांवर आहे. असल्याने आळशी अवस्थेतून बाहेर यावे लागते. खुनाचा आतापर्यंतचा सर्वात मजेशीर पद्धतीने तपास उलगडणारा एक गूढ थरार बघायला मिळणार आहे.

झी५ इंडियाचे चीफ बिझनेस ऑफिसर मनीष कालरा म्हणाले, "झी५ मध्ये आम्ही आमच्या प्रेक्षकांना चित्तवेधक कथा सादर करण्यास वचनबद्ध आहोत आणि 'रौतू का राज़' हे त्याचे एक प्रमुख उदाहरण म्हणावे लागेल. कुशलतेने रचलेले खुनाचे गूढ, हा सिनेमा उत्तराखंडच्या नयनरम्य पार्श्वभूमीवर रहस्य आणि नाट्यमय मनोरंजनाचे मिश्रण सादर करतो. 'हड्डी' च्या यशावर आधारित, हा अनोखा आणि विचित्र कथानक सादर करण्यासाठी झी स्टुडिओ आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याबरोबर पुन्हा एकत्र येण्यासाठी झी५ उत्साही आहे. 'रौतू का राज' कथानक एक नवीन मापदंड स्थापित करेल ही आशा मला वाटते. जगभरातील प्रेक्षकांना ही कथा आपलीशी वाटेल. दर्जेदार कंटेंटसाठी गो-टू प्लॅटफॉर्म म्हणून आमचे स्थान आणखी मजबूत करेल.”

झी स्टुडिओ’चे चीफ बिझनेस ऑफिसर उमेश केआर बन्सल म्हणाले, “रौतू का राज हा केवळ एक सिनेमा नसून एका रोमांचक गूढतेच्या पार्श्वभूमीवर मानवी भावनांचा शोध आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या नेतृत्वाखाली, प्रेक्षक शक्तिशाली आणि सूक्ष्म अशा दोन्ही प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा करू शकतात.झी५ सोबत भागीदारीत ही मनोरंजक कथा सादर करण्याचा आम्हाला अभिमान वाटतो. हे कथानक अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवेल हा विश्वास वाटतो".

दिग्दर्शक आणि निर्माते आनंद सुरापूर म्हणाले, "रौतू का राज़ ही एक छोट्या शहरातील कथा आहे. या कथानकात प्रेक्षकांना उत्तराखंड आणि त्याच्या आसपासच्या भागातील चित्तथरारक दृश्य दिसते. सिनेमातील आश्चर्यकारक दृश्ये, आकर्षक कथनासह, सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षक गुंतून राहील. उल्लेखनीय अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी प्रतिभावान कलाकारांचे नेतृत्व करण्यासाठी आमच्यासोबत सामील झाल्याने आम्ही स्वत:ला भाग्यवंत मानतो. त्याचे अतुलनीय अभिनय कौशल्य या शक्तिशाली कथेत जीव ओतते. त्याच्या अभिनयाचा ठसा आगामी वर्षांमध्ये प्रेक्षकांच्या मनात कोरला जाईल. मी फार काही सांगत नाही, 'रौतू का राज़' हा रहस्य आणि जबरदस्त नाट्याने भरगच्च आहे इतकेच सांगतो. या सिनेमाचे कथानक छोट्या शहरातील जीवनाच्या गतीशी सुसंगत आहे आणि म्हणूनच, पात्रे देखील स्वतःच्या तालावर काम करतात. वास्तविक म्हणूनच हा सिनेमा इतर गूढ थरारपटांपेक्षा वेगळा ठरतो".

नवाजुद्दीन सिद्दीकी पुढे म्हणाला, “रौतू का राज़' चा ट्रेलर प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या जगाची आकर्षक झलक देतो. मला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेलं नाट्य पाहण्याची आवड आहे. हा सिनेमा एका अनोख्या वळणासह एका मनोरंजक दृश्याची सैर घडवेल, हे मी आत्मविश्वासाने सांगू शकतो. उत्तराखंडची विचित्र पात्रे, आळशीपणा; पण श्वास रोखून धरायला लावणाऱ्या पार्श्वभूमीमुळे ‘रौतू का राज़’ हटके ठरतो. ट्रेलरमध्ये सिनेमाच्या रहस्यमय कथानकाची झलक दिसते. त्यातून सिनेमाच्या यूएसपीवर प्रकाश पडतो. एक हुशार पोलिस आळशी हत्येचा तपास कसा उलगडतो याची ही कथा आहे. गेल्या वर्षी इफ्फीमध्ये आमचा गाला प्रीमिअर झाला होता, जिथे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि आता झी५ वर हा सिनेमा प्रदर्शित झाल्याने, सुमारे १९० हून अधिक देशांतील झी५ च्या प्रेक्षकांपर्यंत ही कलाकृती पोहोचण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे".

logo
marathi.freepressjournal.in