‘प्रतिबिंब’ - मराठी नाट्य उत्सव; एनसीपीएमध्ये साजरा होणार महाराष्ट्राच्या नाट्यपरंपरेचा सोहळा

‘प्रतिबिंब’ - मराठी नाट्य उत्सव; एनसीपीएमध्ये साजरा होणार महाराष्ट्राच्या नाट्यपरंपरेचा सोहळा

महाराष्ट्र दिन साजरा होण्याच्या आठवड्यामध्ये दरवर्षी ‘नॅशनल थिएटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट’ (एनसीपीए) अभिमानाने ‘मराठी नाट्य उत्सव’ साजरा करत आले आहेत
Published on

महाराष्ट्र दिन साजरा होण्याच्या आठवड्यामध्ये दरवर्षी ‘नॅशनल थिएटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट’ (एनसीपीए) अभिमानाने ‘मराठी नाट्य उत्सव’ साजरा करत आले आहेत. यावर्षीही, मराठी रंगभूमीला उत्तेजन देण्याच्या आणि तिची पाठराखण करण्याच्या उद्देशाने दिग्गजांची नाटके, संवाद, अभिवाचन, चर्चा, कार्यशाळा, स्थळभेट यांचा जल्लोष रंगभूमीवर घेऊन येणार आहेत. ५ ते ७ मे २०२३ यादरम्यान हा महोत्सव एनसीपीएमध्ये साजरा होत आहे. महोत्सवाचे हे १०वे वर्ष असून लोकप्रिय आणि प्रायोगिक कलाकृतींच्या मीलनातून २०२३चा सोहळा होणार आहे.

एनसीपीएचे अध्यक्ष खुश्रू ए संतूक महोत्सवाबद्दल अधिक माहिती देताना म्हणाले की, "स्थापनेपासूनच एनसीपीएने मराठीतील प्रायोगिक आणि अभिजात कलाकृतींना बळ पुरवले आहे. एनसीपीए निर्मित ‘कलगीतुरा’ या नाटकाचा पहिलावहिला ताजा प्रयोग ‘प्रतिबिंब’मध्ये रसिकांच्या भेटीला येत आहे. ‘नवीन मराठी लेखन’ उपक्रमातील हे ‘दर्पण’ विजेते नाटक. ७०० वर्षे वयाची थोर लोकपरंपरा अस्तंगत होण्यापासून वाचवण्याची आगळी कहाणी हे नाटक घेऊन येते. आपण जे करू पाहतोय त्याच्या केंद्रस्थानी संस्कृती जतनाचा विचार असल्यामुळे महोत्सवाची व उपक्रमाची मुहूर्तमेढ करताना हे नाटक समर्पक ठरते. भविष्याकडे नजर रोखताना परंपरेचा सन्मान करण्याचे व्यापक तत्त्व इथे अधोरेखित होते. ज्यांना मराठी समजणार नाही, त्यांच्यासाठी सर्व नाटकांकरिता इंग्रजी सबटायटल्सची सोय पुरवली आहे."

logo
marathi.freepressjournal.in