एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘दूसरी माँ’मधील नेहा जोशी ऊर्फ यशोदा म्‍हणते, ‘’आता योग्‍य भूमिका...

मालिका प्रमुख पात्र यशोदाचा तिच्या पतीच्‍या भूतकाळाशी जुळवून घेण्‍याचा प्रवास आणि तिच्या सावत्र मुलासोबतचे विवादित
एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘दूसरी माँ’मधील नेहा जोशी ऊर्फ यशोदा म्‍हणते, ‘’आता योग्‍य भूमिका...

अभिनेत्री नेहा जोशी एण्‍ड टीव्‍हीवरील नवीन कौटुंबिक मालिका ‘दूसरी माँ’मध्‍ये यशोदा ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. मालिकेचे कथानक यशोदाच्‍या (नेहा जोशी) अवतीभोवती फिरते, जी उत्तरप्रदेशमध्‍ये तिचे पती, दोन मुली व सासरच्‍या माणसांसोबत आनंदाने राहत असते. पण ती आणि तिचा पती नकळतपणे त्‍याचा अवैध मुलगा कृष्‍णाला दत्तक घेतात, तेव्‍हा त्‍यांचे आनंदी व शांतमय कौटुंबिक जीवन अस्‍ताव्‍यस्‍त होऊन जाते. या मालिकेमध्‍ये आयुध भानुशाली कृष्‍णाची भूमिका साकारणार आहे. मालिका प्रमुख पात्र यशोदाचा तिच्या पतीच्‍या भूतकाळाशी जुळवून घेण्‍याचा प्रवास आणि तिच्या सावत्र मुलासोबतचे विवादित, खडतर नातेसंबंध दाखवते. या गप्‍पागोष्‍टी करताना नेहा जोशीने तिची नवीन मालिका, तिची भूमिका, विवाहानंतरचे जीवन अशा ब-याच गोष्‍टींबाबत सांगितले.

१. आम्‍हाला मालिका ‘दूसरी माँ’मधील तुझ्या भूमिकेबाबत सांग.

यशोदा समर्पित गृहिणी व सामाजिक कार्यकर्ती आहे. ती प्रेमळ, व्‍यावहारिक महिला आहे. तिला दोन मुली आहेत आणि तिला त्‍यांचा अभिमान आहे. ती कोणाचाही अनादर करत नाही, पण कोणाकडूनही अपमान झालेला सहन होणार नाही हे इतरांना कळून देण्‍याबाबत संकोच करत नाही. ती लोकांना तिच्‍या अनोख्‍या पद्धतीने व हुशारीने त्‍यांच्‍या चुकांची जाणीव करून देते. कामादरम्‍यान ती एकल अविवाहित माता मायाला भेटते, जी मृत्‍यूच्‍या वाटेवर असते. यशोदा मायाला तिचा एकमेव मुलगा कृष्‍णाची काळजी घेण्‍याचे आणि त्‍याचे भविष्‍य सुनिश्चित करण्‍याचे वचन देते.

२. वास्‍तविक जीवनात तू आणि यशोदा यांच्‍यामध्‍ये किती साम्‍य आहे?

यशोदा आणि माझ्यामध्‍ये फार कमी साम्‍य आहेत. यशोदाप्रमाणे माझा देखील जीवनाप्रती वास्‍तविक दृष्टिकोन आहे आणि मला लबाडी आवडत नाही. मी इतरांचा आदर करते आणि मला कौतुक केल्‍याचा आनंद होतो. पण सर्वात महत्त्वाची बाब म्‍हणजे माझे माझ्या कुटुंबावर व माझ्या पतीवर खूप प्रेम आहे.

३. महाराष्‍ट्रीयन असल्‍यामुळे तू उत्तरप्रदेशच्‍या पार्श्‍वभूमीवर आधारित मालिकेमध्‍ये भाषाशैलीवर कशाप्रकारे काम केले?

कलाकार म्‍हणून मला नवीन आव्‍हाने स्‍वीकारायला आवडतात. यामधून मला समाधान मिळते आणि कलाकार म्‍हणून निपुण होण्‍यास मदत होते. तसेच यामधून बरेच काही शिकायला मिळते. महाराष्‍ट्रीयन असल्‍यामुळे मला यूपीची भाषा व जीवनशैलीशी जुळवून घ्‍यावे लागले. मला त्‍यामधील बारकावे जाणून घेण्‍यासाठी आणि भूमिकेमध्‍ये सामावून जाण्‍यासाठी कार्यशाळेत अथक मेहनत घ्‍यावी लागली. मी यूपीमधील काही महिलांना भेटून त्‍यांची वागणूक व जीवनशैली जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न केला. माझ्या रंगभूमी पार्श्‍वभूमीने देखील मला भूमिकेचे बारकावे उत्तमपणे समजण्‍यास मदत केली. दिग्‍दर्शक इम्तियाज पंजाबी परफेक्‍शनिस्‍ट आहेत आणि प्रत्‍येक गोष्‍टीची बारकाईने काळजी घेतात. मी यापूर्वी मालिका ‘एक महानायक - डॉ. बी. आर. आम्‍बेडकर’मध्‍ये त्‍यांच्‍यासोबत काम केले आहे, ज्‍यामुळे त्‍यांना समजून घेणे व त्‍यांना आवश्‍यक असलेल्‍या बाबींमध्‍ये सामावून जाणे सोपे झाले.

४. तू पुन्‍हा एकदा आयुध भानुशालीसोबत काम करत आहेस, त्‍याबाबत कसे वाटते?

आम्‍हाला खूपच आनंद झाला असून आम्‍ही उत्‍सुक आहोत. आम्‍ही नेहमी एकमेकांच्‍या संपर्कात आहोत. वेळ मिळाला की आम्‍ही एकमेकांना कॉल करतो, मेसेज करतो आणि भेटतो. आमच्‍यामधील नाते अत्‍यंत खास आहे. वास्‍तविक जीवनात देखील मी त्‍याला माझ्या मुलासारखेच वागवते. मला मालिका ‘दूसरी माँ’साठी पुन्‍हा त्‍याच्‍यासोबत काम करणार असल्‍याचे समजल्‍यानंतर खूपच आनंद झाला आणि आयुधऐवजी दुस-या सर्वोत्तम सह-कलाकाराची अपेक्षा करू शकले नाही. आम्‍ही नेहमी एकत्र खूप धमाल केली आहे आणि आता आम्‍हाला अधिक धमाल करायला, गप्‍पागोष्‍टी करायला, तालीम करायला आणि मालिकेसाठी शूटिंग करायला मिळणार आहे. मला खात्री आहे की, प्रेक्षकांना मागील मालिकेप्रमाणे या मालिकेमधील देखील आमचे समीकरण आवडेल.

५. या मालिकेच्‍या संकल्‍पनेशी संलग्‍न मित्र, कुटुंब किंवा शेजा-यांसोबत वैयक्तिक अनुभव आहेत का?

माझ्या कुटुंबासोबत किंवा माझ्या अवतीभोवती असलेल्‍या लोकांच्‍या बाबतीत असे कधीच घडलेले नाही. पण मी स्‍वत:चे मूल नसलेल्‍या बाळाचे संगोपन करणा-या आईबाबत कथा ऐकल्‍या आहेत. मालिका ‘दूसरी माँ’चे कलानक, प्रमुख पात्राची स्थिती, एक आई आणि तिच्‍या पतीच्‍या अवैध मुलाचा प्रवास या मालिकेला भारतीय टेलिव्हिजनवरील अद्वितीय कौटुंबिक मालिका बनवतात.

६. पुन्‍हा आईची भूमिका साकारत असल्‍यामुळे तुला फक्‍त अशा भूमिकांपर्यंत मर्यादित राहून टाइपकास्टिंगचा शिक्‍का लागेल असे वाटते का?

भूमिकेचे व्‍यक्तिमत्त्‍व, प्रवास व सादरीकरण महत्त्‍वाचे असते. प्रबळ भूमिका इतरांपेक्षा वरचढ ठरण्‍यासोबत कलाकार म्‍हणून निपुण होण्‍यास मदत देखील करतात. प्रेक्षकांशी संलग्‍न होणा-या व वरचढ ठरणा-या भूमिका साकारण्‍यावर माझा दृढ विश्‍वास आहे. यशोदाची भूमिका मला तिच्‍या व्‍यक्तिमत्त्वामधील विविध पैलू दाखवण्‍याची संधी देते. आता योग्‍य भूमिका मिळण्‍यासाठी टाइपकास्टिंगचा अडथळा राहिलेला नाही. काळ बदलला आहे आणि प्रेक्षक आमच्‍या अभिनयाचे कौतुक करतात.

७. तुझा नुकताच विवाह झाला आहे आणि तू जयपूरमध्‍ये शूटिंग करत आहेस. या दोन्‍ही गोष्‍टी कशाप्रकारे सांभाळतेस?

ओमकार अत्‍यंत सहाय्यक पती आहे. मला आठवते की, आम्‍ही आमच्‍या विवाहाची तारीख ठरवली आणि मला या मालिकेसाठी विचारण्‍यात आले. मी मालिकेमध्‍ये काम करण्‍यास उत्‍सुक असताना देखील मनात एकाच वेळी विवाहाची तयारी आणि शूटिंग, त्‍यानंतर मालिकेचे जेथे शूटिंग केले जात आहे तेथे जयपूरला जाण्‍याबाबत चिंता भेडसावत होती. पण ओमकारने माझ्या सर्व चिंता दूर केल्‍या आणि सर्वकाही सुरळीत घडले. आम्‍ही एकमेकांना भेटून बरेच वर्षे झाले आणि आम्‍ही जवळपास आठ महिने लिव्‍ह-इन रिलेशनशिपमध्‍ये राहिलो आहोत. ज्‍यामुळे आम्‍ही एकमेकांना समजून घेण्‍यासाठी बराच वेळ एकत्र व्‍यतित केला आहे. मी शूटिंग करत असल्‍यामुळे मला त्‍याच्‍यासोबत कमी वेळ व्‍यतित करण्‍यास मिळत असले तरी आम्‍ही लवकरच जयपूर किंवा मुंबईमध्‍ये भेटणार आहोत. सर्वकाही सुरळीतपणे पार पाडण्‍यासाठी त्‍याचा पाठिंबा असल्‍याने मी स्‍वत:ला नशीबवान मानते.

दूसरी माँ या मालिकेतुन अभिनेत्री नेहा जोशी २० सप्‍टेंबरपासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in