''अरे भाई ये कोई खिलोना है क्या...''अभिनेत्री देबिना बॅनर्जीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांचा संताप

देबिना अनेकदा मुलींसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. दरम्यान देबिनानं शेअर केलेल्या व्हिडीओने देबिना आणि गुरमीत ट्रोल होतं आहेत.
''अरे भाई ये कोई खिलोना है क्या...''अभिनेत्री देबिना बॅनर्जीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांचा संताप

अभिनेत्री देबिना बॅनर्जी हिने नुकताच मुलीसोबत खेळतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. देबिनाला लियाना आणि देवीशा या दोन मुली आहेत. देबिना अनेकदा मुलींसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. दरम्यान देबिनानं शेअर केलेल्या व्हिडीओने देबिना आणि गुरमीत ट्रोल होतं आहेत.

देबिना बॅनर्जीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये देबिना आणि गुरमीत हे त्यांच्या मुलीसोबत खेळताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये देबिना आणि गुरमीत हे त्यांची मुलगी लियाना हिला दोघांच्या हातात पकडतात आणि हाताने गोल फिरवतात, हा व्हिडीओ 2.06 लोकांनी पाहिला आहे.

देबिना आणि गुरमीत यांची मुलीला खेळवण्याच्या पद्धतीवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्यानं त्यांच्या व्हिडीओला कमेंट केली, ''अरे, ती काय खेळणं आहे का'' असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "मुलीला असं खेळवू नका, कदाचित तिला दुखापत होऊ शकते." अशी कमेंट केली, "हा खेळ दिसायला खूप चांगला दिसत आहे, पण हे खूप डेंजर आहे" असल्याचही एकाने म्हंटलं आहे.

देबिना आणि गुरमीत यांनी 15 फेब्रुवारी 2011 रोजी लग्न केले. लग्नाच्या 11 वर्षानंतर देबिना आई झाली. देबिना ही तिच्या मुलींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in