टायगर श्रॉफच्या आयुष्यात आली नवी 'दीशा'? वर्षभरापासून करतोय डेट

एका मुलाखतीत टायगरने तो सिंगल असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर तो आणि दिशा कधीच एकत्र दिसले नाहीत.
टायगर श्रॉफच्या आयुष्यात आली नवी 'दीशा'? वर्षभरापासून करतोय डेट

बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते, पण दीड वर्षांपूर्वी त्यांचं ब्रेकअप झालं होतं. मात्र, त्या दोघांनीही आपल्या ब्रेकअपची माहिती दिली नव्हती, पण एका मुलाखतीत टायगरने तो सिंगल असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर तो आणि दिशा कधीच एकत्र दिसले नाहीत. अशातच आता टायगरच्या आयुष्यामध्ये दुसरी 'दीशा' आल्याची चर्चा सगळीकडे होत आहे.

'नवभारत टाइम्स' च्या रिपोर्टनुसार टायगर हा दीड वर्षांपेक्षा जास्त काळापासून एका मुलीला डेट करत असून तिचे नाव दीशा धानुका असं आहे. ती एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये उच्च पदावर काम करते. दिशा पाटनीपासून वेगळं झाल्यानंतर टायगरने दीशा धानुकाला डेट करायला सुरुवात केली, असं म्हटलं जातंय.

"ते दोघे जवळपास दीड वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दीशा टायगरला स्क्रिप्टसाठी मदत सुद्धा करते, तर टायगर तिला फिटनेस टिप्स देतो. टायगरच्या कुटुंबालाही दिशा आवडते. सर्वांनाच या दोघांच्या रिलेशनबद्दल माहिती आहे", असं त्यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in