निक जोनास गाता गाता स्टेटवर पडला आणि...; व्हिडिओ व्हायरल

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा नवरा आणि लोकप्रिय अमेरिकन गायक निक जोनास हा सतत कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असतो.
निक जोनास गाता गाता स्टेटवर पडला आणि...; व्हिडिओ व्हायरल

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा नवरा आणि लोकप्रिय अमेरिकन गायक निक जोनास हा सतत कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. जगभरात त्याचे करोडो चाहते आहेत. तो नेहमी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो. मग कधी त्याची मुलगी मालती सोबत तर कधी प्रियंका सोबत त्याचे व्हिडिओ व्हायरल होत राहतात. निकला अनेकदा प्रियांका सोबत अवॉर्ड शो मध्ये लोकांनी पहिले आहे. त्यांचे चाहते त्यांच्या व्हिडिओला खूप चांगल्या कंमेंट करत असतात. नुकताच निकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये निक त्याचा भाऊ केविन जोनस आणि जो जोनास सोबत स्टेजवर गाताना दिसत आहे. अचानक गाता गाता त्याचा तोल जाऊन निक स्टेजवरुन खाली पडला. पण पडल्यानंतर सुद्धा निक लगेच उभा राहिला आणि पुन्हा गायला सुरुवात केली. निकचा असा आत्मविश्वास बघून चाहते त्याच कौतुक करत आहेत. तर काही लोकांनी त्याच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. अनेक चाहत्यांनी निकच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे की, "पडल्यानंतर देखील निक ज्या प्रकारे उठला ते अप्रतिम आहे." तर दुसऱ्या युजरने लिहिले की, "निकला दुखापत झाली तर नसेल ना?" तर काही लोक कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना खडे बोले सुनावत आहेत. स्टेजची रचना अशी धोकादायक पद्धतीने का केली आहे? असा प्रश्न काहीजण विचार आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी निकचा कॉन्सर्टचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यावेळी निक गाणं गात असताना अचानक एक चाहतीने त्याच्यावर अंतर्वस्त्र (ब्रा) फेकले होते. चाहतीच्या या कृत्यामुळे निक काही क्षण थांबला आणि नंतर पुन्हा नव्याने गाणं गाऊ लागला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in