निलेश म्हणतोय "बोले तो झक्कास..."

निलेश म्हणतोय "बोले तो झक्कास..."

चला हवा येऊ द्या आणि त्यातील विनोदवीर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत

झी मराठीवरील मनोरंजनाचे कार्यक्रमाला प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळते. धकाधकीच्या जीवनात थोडा वेळ विनोदची मज्जा अनुभवण्यासाठी झी मराठीने चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाची निर्मिती केली. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला. चला हवा येऊ द्या आणि त्यातील विनोदवीर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाला पसंती मिळत आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी आहे कि मराठी सोबत हिंदी कलाकार सुद्धा ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर येण्यासाठी उत्सुक असतात.

या कार्यक्रमातील विनोदवीर भाऊ कदम,कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे,सागर कारंडे आणि श्रेया बुगडे हे अवलिया इतर कलाकारांसोबत अनेक विनोदी स्किट सादर करत असतात. वेगवेगळे चित्रपट विनोदी पद्धतीने हे कलाकार प्रेक्षकांसमोर सादर करतात.आवडीने पाहिल्या जाणाऱ्या या कार्यक्रमामध्ये मराठी व हिंदी कलाकार दर आठवड्याला येत असतात.येत्या आठवड्यात चला हवा येऊ द्याच्या मंचावर हिंदी चित्रपट जुग-जुग जियो मधील कलाकार येणार आहेत. अभिनेता वरुण धवन, कियारा अडवाणी आणि अनिल कपूर प्रेक्षकांच्या खास भेटीस येणार आहेत.

थुकरट वाडीत येण्यासाठी या कलाकारांनी चक्क मेट्रोतुन प्रवास केला आहे. तसंच चला हवा येऊ द्याच्या मंचावर थुकरटवाडीतील विनोदवीरांचा कल्ला पाहून या कलाकारांना हसू आवरेनासे झाले.त्यांनी मंचावर चाललेल्या धमाल मस्तीचे व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावरून देखील शेअर केले. इतकंच नव्हे तर कसे आहेत मंडळी?, हसताय ना? असं विचारणारा डॉक्टर अनिल कपूरसोबत बोले तो झक्कास म्हणतो आहे.तसेच डॉक्टर निलेश साबळेने अनिल कपूर यांच्यासोबतच एक सुंदर फोटो शेअर करून त्याला "बोले तो झक्कास..." असं कॅप्शन दिले आहे. हा फोटो देखील एकदम झक्कास आला आहे. प्रेक्षकांनी त्या फोटोवर अनेक कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षावा केला आहे. या भागातील सर्व धमाल मजा मस्ती प्रेक्षकांना सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वाजता बघायला मिळणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in