`इमर्जन्सी` शुक्रवारपासून लागू होणार नाही! 'सेन्सॉर'ला प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यास HC चा नकार

लोकसभा खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत हिची मुख्य भूमिका असलेल्या इमर्जन्सी चित्रपटाला सेन्सॉर सर्टिफिकेट न मिळाल्याने शुक्रवारचा (६ सप्टेंबर) मुहूर्त पुन्हा हुकला आहे.
'इमर्जन्सी'च्या ट्रेलरमध्ये कंगना रणौत
'इमर्जन्सी'च्या ट्रेलरमध्ये कंगना रणौत
Published on

मुंबई : लोकसभा खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत हिची मुख्य भूमिका असलेल्या इमर्जन्सी चित्रपटाला सेन्सॉर सर्टिफिकेट न मिळाल्याने शुक्रवारचा (६ सप्टेंबर) मुहूर्त पुन्हा हुकला आहे. न्या. बी. पी. कोलाबावाला आणि न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने सर्टिफिकेट देण्याबाबत सेन्सॉर बोर्डाला थेट आदेश देता येणार नाहीत, असे स्पष्ट करत याचिकेची सुनावणी १९ सप्टेंबरला निश्चित केली.

अभिनेत्री कंगणा रणौतच्या इमर्जन्सी चित्रपटाच्या रिलीज डेट आणि सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी झी एन्टरटेन्मेटने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्या. बी. पी. कोलाबावाला आणि न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

खंडपीठाने याचिकेची दखल घेतली. सेन्सॉर बोर्डाने सुचविलेले कट्सचा विचारात घेऊन निर्मात्यांनी पुन्हा नव्याने सादरीकरण करावे. सेन्सॉर बोर्डाने गणपतीचे कारण न देता त्यावर १८ सप्टेंबरपर्यंत योग्य तो निर्णय घ्यावा, असे निर्देश देत याचिकेची सुनावणी १९ सप्टेंबरला निश्चित केली.

logo
marathi.freepressjournal.in