Bigg Boss Marathi 5: कोण बनणार रद्दीचा भार? आज घरात रंगणार नॉमिनेशन टास्क

Nomination task bigg boss: आज 'बिग बॉस मराठी'च्या घरात ज्याचा खेळ दमदार नाही तो सरळ रद्दीचा भार बनणार आहे.
Bigg Boss Marathi 5: कोण बनणार रद्दीचा भार? आज घरात रंगणार नॉमिनेशन टास्क
Published on

Bigg Boss Marathi New Season Day 37 : 'बिग बॉस मराठी'च्या 'लयभारी' सीझनची सध्या सर्वत्र चर्चा आहे. गेला महिनाभर सदस्यांनी 'बिग बॉस मराठी'च्या घरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सर्वच टास्क, सदस्यांचे कमाल गेम प्लॅन चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. पण भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ म्हटल्याप्रमाणे 'बिग बॉस मराठी'चा सहावा आठवडा खूप कठीण असणार आहे. या आठवड्यात नक्की काय होणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे.

आज 'बिग बॉस मराठी'च्या घरात ज्याचा खेळ दमदार नाही तो सरळ रद्दीचा भार बनणार आहे. प्रोमोमध्ये, असमाधानकारक कामगिरी करणाऱ्या सदस्यांना आज रद्दीत टाकून इतर सदस्य नॉमिनेट करताना दिसणार आहेत. स्वत:चं डोकं नसणाऱ्यांना, खेळातला समज नसणाऱ्या, स्वत:ची मतं नसणाऱ्या, घरातल्या गद्दार व्यक्तीला सदस्य नॉमिनेट करताना दिसणार आहेत. त्यामुळे सहाव्या आठवड्यात कोणता सदस्य नॉमिनेट होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Bigg Boss Marathi 5: कोण बनणार रद्दीचा भार? आज घरात रंगणार नॉमिनेशन टास्क
मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा उलगडणार ‘वीर मुरारबाजी...पुरंदरकी युद्धगाथा’ या चित्रपटातून
Bigg Boss Marathi 5: कोण बनणार रद्दीचा भार? आज घरात रंगणार नॉमिनेशन टास्क
Bigg Boss Marathi 5: "मी विलन ठरली..." निक्कीला कॅप्टनसी पडली भारी

पॅडी गेला निक्कीच्या बोटीत

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात 'बिग बॉस' पॅडीला विचारत आहेत,"पंढरीनाथ शर्ट छान आहे..गोव्याचा प्लॅन आहे का?". त्यावर बिग बॉसला उत्तर देत पॅडी दादा म्हणतो,"मला गोवा आवडतो. गोव्याला जाऊन मी नाटकाचे प्रयोग करतो, सिनेमाचं शूटिंग करतो". पुढे बिग बॉस म्हणतात,"धनंजय काहीतरी वेगळच म्हणत आहेत". दरम्यान पॅडी दादा निक्कीच्या सोफ्यावर जाऊन बसतात. त्यामुळे बिग बॉस पॅडीला निक्कीच्या बोटीत गेल्याचं म्हणतात.

logo
marathi.freepressjournal.in