ट्रोलर्सवर भडकली नोरा फतेही ; म्हणाली, "लोकांना माझं सौंदर्य... "

सुकेश चंद्रशेखरनं केलेल्या हजारो कोटींच्या घोटाळ्यात नोराचं नाव आल्यामुळे तिची डोकेदुखी वाढली आहे.
ट्रोलर्सवर भडकली नोरा फतेही ; म्हणाली, "लोकांना माझं सौंदर्य... "

बॉलीवूडमध्ये नोरा फत्तेही आली आणि बॉलीवूडचा डान्स करण्याचा अंदाजच बदलून गेला. बॉलीवूडमधील प्रसिद्ध आयटम गर्ल म्हणून नोराचं नाव घेतलं जाऊ लागलं. नोराचं फक्त भारतामध्ये नाही तर संपूर्ण जगभरात तिचं नाव असून जगभरात नोराच्या डान्सचे शो होऊ लागले आहेत. काही दिवसांपूर्वी तिची वर्ल्ड टूर झाली. त्याला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता.

नोरचा सोशल मीडियावरील फॅनबेस देखील खूप मोठा आहे. तिला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्या ही ४५ मिलिअन क्रॉस आहे. नोराचा वेगवेगळ्या लूक्स वर प्रेक्षक घायाळ होतात. तिची डान्स करण्याची पद्धतही खूप वेगळी आहे. सध्या नोरा टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अशा काही रियॅलिटी शो मध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसत असते. याशिवाय येणाऱ्या काळात ती बॉलीवूडच्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये सुध्दा दिसणार आहे. नोराने 'दिलबर', 'साकी साकी' आणि 'मिलेगी मिलेगी' अशी प्रसिद्ध गाणी परफॉर्म केली आहेत.

नोरा ही आजकाल वेगवेगळ्या कारणांमुळे ट्रोलही होताना दिसते. सुकेश चंद्रशेखरनं केलेल्या हजारो कोटींच्या घोटाळ्यात नोराचं नाव आल्यामुळे तिची डोकेदुखी वाढली असून नोराला पटियाला कोर्टानं हजर राहण्याचे आदेशही दिले होते. या सगळ्यांमध्ये नोरावर सोशल मीडियातून कठोर शब्दांत टीका देखील केली गेली. त्यामुळे व्यथीत झालेल्या नोराने एका मुलाखतीमधून टीका करणाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

बॉलीवूडमध्ये गेल्या सहा ते सात वर्षांपासून काम करत असलेल्या नोरानं सांगितले की, "चाहत्यांना माझे सेलिब्रेटीपद दिसते. माझी श्रीमंती दिसते, माझ्या सौंदर्यावर ते घायाळ होतात. पण नोरा कोण होती, ती कुठून आली आहे. याविषयी त्यांना काहीही माहिती नाही. नोरा ही कोणत्या गल्लीबोळात राहायची हे त्यांना माहित नाही. नोरानं खूप मेहनत केली आहे. सुरुवातीपासून माझा प्रवास खूपच कष्टाचा राहिला आहे. नेटकऱ्यांना कोणतीही गोष्टी माहिती नसताना कोणत्याही माहितीवरून टीका करतात, तेव्हा मला वाईट वाटते. पण मला माझ्या प्रवासाचा गर्व आहे. आतापर्यंतच्या प्रवासात खूप काही पाहीलं आहे. त्यातून मी नेहमी शिकलं आहे. त्यामुळे आता मला थोडेफार यश मिळालं आहे, असं नोरा सांगते. यशस्वी होण्यासाठीअफाट मेहनत घ्यावी लागते. ती करत गेले. त्यामुळे लोकं जे काही बोलतात त्याकडे मी फारसं लक्ष देत नाही",असंही नोरानं यावेळी सांगितलं.

'मी अक्टटिंग शिकली मी डान्स शिकला तेव्हा मी आता कुठे तुमच्या समोर जज म्हुणुन आहे. माझ्या या प्रवासात मला सगळं काही सहजासहजी मिळालं नाही. पण मला कुठे जायचं होतं हे माहिती असल्यानं मी फोकस होती. मी आतापर्यत जगातल्या सर्वात मोठ्या मंचावर परफॉर्मन्सही केला आहे. यापेक्षा मोठा आनंद माझ्यासाठी नाही' असंही नोरानं म्हटलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in