'ड्रीम गर्ल २' च्या कास्टिंगबद्दल नुसरतने व्यक्त केली खंत, म्हणाली...

'ड्रीम गर्ल २' हा चित्रपट 25 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाची प्रेक्षकवर्ग आतुरतेने वाट पाहत आहेत.
'ड्रीम गर्ल २' च्या कास्टिंगबद्दल नुसरतने व्यक्त केली खंत, म्हणाली...

मनोरंजन सृष्टीत सद्या चित्रपटांची मेजवानी सुरु आहे. मग तो अक्षय कुमारचा 'ओह माय गॉड २' असेल नाहीतर सनी देओलचा 'गदर २' किंवा थलायवाचा 'जेलर'. या सगळ्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आता त्यामध्ये आणखी एक चित्रपट भर देण्यासाठी येणार आहे. तो म्हणजे 'ड्रीम गर्ल २' हा चित्रपट 25 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाची प्रेक्षकवर्ग आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी देखील रिलिज झाली आहेत. यांना प्रेक्षकांचा भरभरुन असा प्रतिसाद मिळाला आहे. सध्या 'ड्रीम गर्ल 2' चित्रपटाचे कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.

हा चित्रपट 2019 मध्ये आलेल्या 'ड्रीम गर्ल' या चित्रपटाचा सिक्वल आहे. पहिल्या भागात नुसरत भरूचा आणि आयुष्मान खुराना हे दोन्ही कलाकार होते. तर यावेळी सिक्वलमध्ये नुसरत भरुचाच्या जागी अनन्या पांडेला कास्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे आता 'ड्रीम गर्ल २' मध्ये नुसरत दिसणार नाही. नुरसतच्या चाहत्यांना हे मुळीचं आवडलेलं नाही. आता यावर नुसरतने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'etimes' शी बोलताना नुसरत भरुचाने या विषयवार भाष्य केलं. ती म्हणाली की, "ड्रीम गर्ल' या चित्रपटावेळी टीमबरोबर काम करताना तिला खूप मजा आली होती. मात्र, या सिनेमाच्या दुसऱ्या भागात तिला का घेतलं नाही याबद्दल तिला काही माहित नाही. याचं उत्तर आता तुम्हला 'ड्रीम गर्ल 2' चे निर्मातेच सांगू शकतात" असं ती म्हणाली. पुढे कास्टिंगबद्दल बोलतांना नुसरत म्हणाली की, "ती देखील एक माणूस आहे, त्यामुळे तिला जेव्हा हे कळालं तेव्हा तिला नक्कीच खूप वाईट वाटलं. अर्थातच ते अन्यायकारक होतं. चित्रपटात कोणाला कास्ट करायचा कोणाला नाही हा निर्मात्यांचा निर्णय आहे. हे तिला आता समजलं आहे".

सध्या नुसरत भरुचा तिच्या 'अकेली' या चित्रपटाचे प्रमोशन करण्यामध्ये व्यस्त आहे. तिचा हा सिनेमा देखील 25 ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. जो आयुष्मान खुरानाच्या 'ड्रिम गर्ल2' ला चांगलीच टक्कर देईल असं बोललं जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in