कौतुकास्पद! 'ओएमजी २' पाहिल्यानंतर उल्हासनगरमधील शाळेने घेतला मोठा निर्णय

'ओएमजी २' च्या त्या खास स्क्रिनिंगला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर त्या संस्थेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
कौतुकास्पद! 'ओएमजी २' पाहिल्यानंतर उल्हासनगरमधील शाळेने घेतला मोठा निर्णय

अभिनेता अक्षय कुमारचा 'ओएमजी २' चित्रपट प्रदर्शित झाला आणि एका वेगळ्याच महत्वाच्या मुद्याला हात घातला. यानंतर या विषयाच्या चर्चेला सुरुवात झाली. सनी देओलचा 'गदर २' आणि अक्षय कुमारचा 'ओएमजी २' एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. या सगळ्यामध्ये अक्षयचा 'ओएमजी २' ची कथा पूर्णपणे वेगळी आहे. त्याच्या चित्रपटाच्या कथेचा विषयही जरा हटके आहे. पौंगडावस्थेतील मुलांसाठी लैंगिक शिक्षण याविषयावर अक्षयनं 'ओएमजी २' मध्ये वेगळी मांडणी केली आहे. अनेक लोकांना हा चित्रपट प्रचंड भावल्याचे दिसून आले आहे. अनेकांनी अक्षयला याबाबत शाबासकी दिली आहे. तर अनेकांनी चित्रपटातील कलाकारांच्या टीमचं कौतुक केलं आहे.

'ओएमजी २' बघितल्यानंतर ठाण्याच्या उल्हासनगरमधील एका इज्युकेशन सोसायटीनं आपल्या शाळेतील अभ्यासक्रमांमध्ये काही महत्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आता यावर्षांपासून शालेय वेळापत्रकात लैंगिक शिक्षणाचा समावेश केल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी 'ओएमजी २' हा चित्रपटाचे खास स्क्रिनिंग सुद्धा आयोजित केलं होत. त्या स्क्रिनिंगला पदाधिकाऱ्यांसोबत पालकांचाही मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद मिळाला. त्यात स्थानिक आमदारांचा देखील सहभाग होता. या सगळ्यामध्ये १८४ शिक्षक, प्राचार्य आणि उल्हासनगर परिसरातील १५ शाळांनी त्या स्क्रिनिंगला उपस्थिती लावली असून याशिवाय 'ओएमजी २' या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक अमित राय यांना देखील त्या स्क्रिनिंगसाठी विशेष निमंत्रित करण्यात आलं होतं.

'ओएमजी २' च्या त्या खास स्क्रिनिंगला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर त्या संस्थेकडून मोठा निर्णय घेण्यात आला. याबाबतचं सविस्तर वृत्त 'फ्री प्रेस जर्नलनं'ने दिलं आहे. संस्था आयोजकांनी आता त्यांच्या शालेय वेळापत्रकामध्ये सेक्स एज्युकेशनचा समावेश देखील केला आहे. अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे आणि त्याला चांगला प्रतिसादही दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in